‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पाहुण्या म्हणून गेलेल्य...

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पाहुण्या म्हणून गेलेल्या स्मृति ईराणी यांना गार्डने प्रवेश नाकारला (The Kapil Sharma Show: Union Minister Smriti Irani Returned Without Shooting When Guard Of The Show Did Not Give Her Entry)

छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या प्रसिध्दीसाठी हजेरी लावत असतात. आगामी एपिसोडमध्ये अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या. मात्र, त्यांना प्रवेश नाकारला गेल्याने आता हे शूट रद्द करावे लागले आहे.

स्मृती इराणी मुंबईतील ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर पोहोचल्या होत्या, पण तिथे उभ्या असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. स्मृती इराणी यांनी गार्डला समजवण्याचा खूप प्रयत्न केला आणि सांगितले की, त्या शोमध्ये पाहुण्या म्हणून आल्या आहेत आणि त्या केंद्रीय मंत्री देखील आहे. मात्र, सुरक्षारक्षक हे मान्य करायला तयार नव्हते. आपल्याला याबाबत कोणतीच माहिती दिली गेली नसल्याचे सांगत, एका सामान्य महिलेप्रमाणे शोमध्ये पोहोचलेल्या स्मृती यांना गार्डने आत प्रवेश देण्यास स्पष्टपणे नकार दिला.

तब्बल अर्धा तास स्मृती इराणी यांना या सेट बाहेर ताटकळत उभे राहावे लागले होते. मात्र, नंतर त्या तिथून दिल्लीला रवाना झाल्या. या शोचा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याला सादर प्रकार कळताच त्याने गार्डला फटकारले. नंतर, कपिल शर्माने संपूर्ण परिस्थिती स्मृती इराणींना सांगून, त्यांची माफी देखील मागितली आहे. मात्र, आता त्या पुन्हा या शोमध्ये सहभागी होणार की नाही अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फोटो सैजन्य: इन्स्टाग्राम

स्मृती इराणींबद्दल सांगायचं तर आपलं वजन कमी केल्यापासून मागील काही दिवस त्या चर्चेत आहेत. आता त्या बऱ्याच बारीक झाल्यामुळे त्यांचे आधीचे व आत्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते त्यांच्याकडून बारीक होण्याचे उपाय विचारत आहेत. त्यांच्या अभिनयातील करिअरबद्दल बोलायचं तर, त्यांनी एकता कपूरच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत तुलसी ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. तेव्हा त्यांची एकता कपूरशी झालेली मैत्री अजूनही अबाधित आहे.

फोटो सैजन्य: इन्स्टाग्राम (सर्व फोटो)