‘चिमणराव…..गुंड्याभाऊ’ महाविनोदी मालिका नव्या ढ...

‘चिमणराव…..गुंड्याभाऊ’ महाविनोदी मालिका नव्या ढंगात पुन्हा येणार ( The Great Comedy Serial ‘Chimanrao-Gundyabhau’ To Appear Again In New Form)

जेव्हा मुंबई दूरदर्शन केंद्र हे एकच टेलिव्हिजन चॅनल होतं , जेव्हा त्या चॅनलचे कार्यक्रम ब्लॅक अॅन्ड व्हाईट दिसत असत , त्या काळी ‘ चिमणराव गुंड्याभाऊ ‘ नावाची महाविनोदी मालिका या केन्द्राने निर्माण केली होती . दर बुधवारी, म्हणजे आठवड्यातून एकदाच लागणारी ही मालिका सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांच्या विनोदी साहित्यावरून घेण्यात आली होती. सदर मालिका त्या काळी तुफान लोकप्रिय झाली होती.

या मालिकेत दिलीप प्रभावळकर यांनी चिमणरावांची तर बाळ कर्वे यांनी गुंड्याभाऊंची भूमिका साकार केली होती. चिमण भाणि गुंड्या ही पात्रे त्या कलावंतांच्या व्यक्तीमत्वाला फिट बसली होती. दोघांची होणारी फजिती , चिमणरावांचे विनोदी कुटुंब प्रेक्षकांना खूपच आवडले होते. दूरदर्शन केन्द्राने वेळोवेळी ही मालिका पुनःपुन्हा प्रक्षेपित केली होती. अगदी अलिकडे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात म्हणजे आत्ताच्या सह्याद्री वाहिनीवर ती प्रक्षेपित झाली, तेव्हाही तिची लोकप्रियता कमी झाली नव्हती.

अशी ही महाविनोदी व लोकप्रिय मालिका पुन्हा निर्माण करण्यात येत असून ती लवकरच सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होईल.

नव्या ढंगातील व नव्या कलावंतांच्या संचातील ही मालिका आता अर्थातच रंगीत असणार आहे. ती पुन्हा पूर्वीप्रमाणेच लोकप्रियता मिळवण्याचती दाट शक्यता आहे.