मुलगी झाली हो, भाकित खरं ठरलं! (The Girl was bo...

मुलगी झाली हो, भाकित खरं ठरलं! (The Girl was born, the prediction comes true!)

२०२० सालामध्ये लॉकडाऊनच्या निमित्ताने हिंदी-मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीतील सेलिब्रेटींनी अँगेजमेंट ते लग्न, बेबी शॉवर आणि मग फाइनल रिझल्ट बाळंतपण अशा सगळ्या फेज अगदी मनसोक्त एन्जॉय केल्या. नुकतेच सत्कारमुर्ती ठरलेल्या विरुष्का दाम्पत्यानेही गुड न्यूज असल्याचे कळल्यापासून ते कन्या रत्न झाले इथपर्यंतच्या सर्वच न्यूज वेळोवेळी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवल्या. अनुष्का बाळंत होण्याच्या दोन-तीन दिवस आधीच भविष्यकर्ते तसेच फेस रिडर्सनी त्यांना कन्या रत्नच होणार असल्याचे भाकित केले होते आणि कन्या रत्नच झाले. पण हे भाकित करण्यामागे एक वेगळंच गमतीशीर कारण आहे.

आत्तापर्यंत बहुतांशी क्रिकेटर्सच्या घरी पहिलं अपत्य म्हणून मुलगीच जन्माला आली आहे. यावरूनच विराटला देखील पहिली मुलगीच होणार असं ठामपणे वर्तविलं होतं, जे खरं ठरलं. तर बघूया हे महान क्रिकेटर्स कोण आहेत ज्यांच्या घरी पहिल्यांदा कन्या जन्माला आली आहे.

सचिन तेंडुलकर – सारा तेंडुलकर ही मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची पहिली मुलगी असून ती १९९७ साली जन्माला आली.

महेंद्र सिंह धोनी – भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांस २०१५ सालच्या वर्ल्ड कप नंतर पहिली मुलगी झाली. तिचं नाव जिवा.

हरभजन सिंह – भारतीय संघाचा स्पिनर बॉलर हरभजन सिंह यानं गीता बसरा हिच्याशी विवाह केला आणि त्यांनाही पहिली मुलगी आहे, इनाया सिंह.

गौतम गंभीर – भारतीय संघात सलामीला येणारा बॅट्समन गौतम गंभीरलाही पहिलं कन्या रत्नच आहे जिचं नाव आजीन गौतम असं आहे.

रोहित शर्मा – भारतीय संघाचा ओपनिंग बॅट्‌समन रोहित शर्मा यांनी स्पोट्‌र्स मॅनेजर रितिका सजदेह हिच्याशी लग्न केलं आणि २०१८ मध्ये त्यांना समायरा झाली.

सुरेश रैना – रैना यांनी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरी हिच्याशी लग्न केलं. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना मुलगी झाली जिचं नाव ग्रेसिया असं आहे.

रविंद्र जडेजा – भारतीय संघाचा ऑल राऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा यांना २०१७ साली निध्याना झाली.

अश्विन – अश्विन जडेजा यांनाही आध्या ही पहिली मुलगीच आहे.

चेतेश्वर पुजारा – यांनीही २०१८ मध्ये आपल्याला कन्या रत्न झाल्याची गोड बातमी ट्वीट करून आपल्या चाहत्यांना दिली होती.

या व्यतिरिक्त अनेक इंटरनॅशनल क्रिकेटर्सना देखील पहिली मुलगी झाली आहे. डेविड वॉर्नर, केन विलियमसन, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग यांसारखे महान क्रिकेटर्स देखील आपल्या मुलींचे प्राउड पप्पा आहेत. तेव्हा विराट-अनुष्का यांचं अभिनंदन!