आगामी ‘बाप माणूस’ चित्रपटात पाहायला...

आगामी ‘बाप माणूस’ चित्रपटात पाहायला मिळणार पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांची फ्रेश जोडी (The Fresh Couple of Pushkar Jog and Anusha Dandekar Will Be Seen in The Upcoming Movie ‘Baap Manus’)

निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी एकत्रित निर्मित करत असलेल्या चौथ्या चित्रपटाची घोषणा आज दसरा सणाचे औचित्य साधून सोशल मीडियावर केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडन मध्ये होणार आहे .

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे आहेत. योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.  

बाप माणूसचे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग आहेत तर सह निर्माते – वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे आहेत .

या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.