‘द फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयी खऱ्या आयुष्यातही कौ...

‘द फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयी खऱ्या आयुष्यातही कौटुंबिक आहे (The Family Man’s Manoj Bajpayee Is A Complete Family Man In Real Life, Meet the Real Family of The Actor)

‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱ्या सीझनला भरघोस यश मिळाल्यामुळे मनोज बाजपेयी खूपच लोकप्रिय ठरला आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझनही कमाल झाला होता. त्यानंतर सर्वच त्याच्या पुढच्या सीझनची वाट पाहत होते. दुसरा सीझन ओटीटीवर प्रदर्शित होताच नेटकरी अक्षरशः वेडे झाले. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधला फॅमिली मॅन हा त्याच्या खऱ्या आयुष्यात कसा आहे, त्याच्या कुटुंबात कोण कोण आहेत, ते आपण पाहुया.

मनोज बाजपेयीने आपल्या कुटुंबास या झगमगत्या दुनियेपासून तसं दूर ठेवलं आहे. त्याला खाजगी आयुष्याबाबत बोलायलाही फारसं आवडत नाही. हां, पण एखादा खास प्रसंग असेल तर आपल्या कुटुंबाचे फोटो तो सोशल मीडियावर जरूर शेअर करतो. मग तो मुलीचा वाढदिवस असो वा इतर समारंभ…

जाणून घेऊया या फॅमिली मॅनच्या कुटुंबात कोण कोण आहे. बायको शबाना आणि मुलगी अवा आणि मनोज असं त्याचं तिघांचंच छोटं कुटुंब आहे.

मनोज बाजपेयीची बायको देखील अभिनेत्री असून तिने हृतिक आणि बॉबीसोबत सिनेमांत काम केलं आहे.

मनोज बाजपेयीच्या पत्नीचं स्क्रीनवरील नाव नेहा होतं. बॉबी देओल सोबत ‘करीब’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर हृतिक रोशन सोबत ‘फिजा’, अजय देवगन सोबत ‘होगी प्यार की जीत’ या चित्रपटांतूनही तिने अभिनय केला. तिचं खरं नाव शबाना आहे, परंतु चित्रपटांसाठी तिनं आपलं नाव बदलून नेहा केलं. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲसिड फॅक्ट्री’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

शबानाशी भेट कशी झाली?

शबानाच्या ‘करीब’ या चित्रपटानंतर ते दोघे एकमेकांना भेटले होते. त्यावेळेस मनोज ‘सत्या’ करत होते. एका महिन्याच्या आत ‘करीब’ आणि ‘सत्या’ दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. या दरम्यान मनोज आणि नेहाची ओळख झाली. नंतर दोघांमधील जवळीक वाढून २००६ मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नानंतर शबानाने चित्रपटातून संन्यास घेतला. दोघांना एक मुलगी आहे, जिचं अवा नालिया असं नाव आहे

मिसेस बाजपेयी आपल्या संसारात आनंदी असून आपला सर्व वेळ ती कुटुंबासाठी देतेय. एका मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं की, ” आम्ही एकमेकांना समजून घेतो. आम्ही आमचं काम आणि खाजगी आयुष्य यांना वेगवेगळं ठेवलं आहे. आमच्यामध्ये एक मजबूत नातं आहे.”

खऱ्या आयुष्यातही आहे पूर्णतः कौटुंबिक

मनोज बाजपेयी खरोखर कौटुंबिक माणूस आहे. एका मुलाखतीत त्याला विचारलं गेलं होतं की, ”तुझ्यासाठी कुटुंब पहिलं आहे की काम? त्यावर त्याने आपल्या कुटुंबास प्रथम प्राधान्य दिलं. माझ्या कुटुंबाच्या सर्व आशा आणि गरजा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यानंतरच मी घराबाहेर पडू शकतो. शुटिंग दरम्यान माझी मुलगी आजारी आहे वा बायकोला बरं नाही, असा एखादा फोन आला तर मी अस्वस्थ होतो. अशा वेळी मी काम करुच शकत नाही. माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा आनंद सगळ्यात आधी आहे. ते आनंदात असतील तरच मी काम करू शकतो.”

मी टोमॅटो खरेदी करतो, पत्नी आणि मुलीसह शॉपिंग मॉलमध्ये जातो

काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबाबाबत बोलताना मनोजने सांगितलं होतं की, ”मी कौटुंबिक आहे. माझ्यात आणि दुसऱ्या लोकांमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे ते कॉर्पोरेट ऑफिसात काम करतात नि मी अभिनय करतो. परंतु काम झाल्यानंतर मला घरीच जाण्यास आवडतं. सुट्टीच्या दिवशी मी देखील बायको आणि पत्नीसोबत शॉपिंग मॉलमध्ये जातो. माझा ड्रायव्हर नाही आला तर मी स्वतः टोमॅटो घ्यायला जातो. हे सर्व करण्यास मला आनंद वाटतो. मला पार्ट्यांना जायला आवडत नाही. शुटिंगनंतर घरी येऊन मी वर्कआऊट करतो, पूजा करतो, वाचन करतो आणि झोपतो.”

मुलगी अवाला मनोज बाजपेयीचे चित्रपट पसंत नाही

मनोज बायपेयीच्या मुलीला आपल्या वडिलांचे चित्रपट पाहायला आवडत नाही. मनोज बाजपेयी ज्या भूमिका साकारतात त्या त्यांच्या मुलीला आवडत नाहीत. परंतु, तिला फॅमिली फॅन चित्रपट खूप आवडला आहे.