गौरीसारखी दिसणारी डॅशिंग पाहुणी ‘सुख म्हणजे नक्...

गौरीसारखी दिसणारी डॅशिंग पाहुणी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये करणार धमाल (The Dashing Girl Who Looks Like Gauri Will Make A Fuss In Marathi Serial ‘Sukh Mhanaje Nakki Kay Asate’)

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या अतिशय रंजक अशा वळणावर आलेली आहे. आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात आल्यानंतर गौरी आणि जयदीप सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवतात. परंतु, त्यानंतर गौरीला मानसी व शालिनी यांचा त्यामागे कट असल्याचं समजतं. ती त्याबद्दल जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करते, पण जयदीप तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता गौरीला उंच कड्यावरून ढकलून देतो. यानंतर गौरीने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच गौरीसारखी दिसणारी डॅशिंग पाहुणी शिर्के पाटलांच्या कुटुंबात दाखल झालेली दिसणार आहे. त्यामुळे लवकरच या मालिकेत नवा धमाका पाहायला मिळणार आहे.

ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. गौरी साधीभोळी होती तर ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे. आता ही गौरीच आहे की तिच्यासारखी दुसरी? हे मालिकेतील पुढील भागांतून कळेलच मात्र गौरीच्या जिवावर उठलेल्यांना ती पळता भुई थोडं करणार आहे, हे नक्की.

गौरीच्या जाण्याने चाहत्यांना वाईट वाटले असले तरी तिच्यासारखी ही हुबेहुब पाहुणी पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता नक्कीच कमालीची वाढली असणार.