कार्तिक आर्यनच्या नावाचे नारे देत जमा झाली गर्द...

कार्तिक आर्यनच्या नावाचे नारे देत जमा झाली गर्दी, या कारणामुळे अभिनेत्याने जिंकली चाहत्यांची मने (The Crowd Of Fans Followed Karthik Aryan And Raised Slogans In The Name Of The Actor, This Act Of The Actor Won Everyone’s Heart)

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन दिवसेंदिवस आपल्या चाहत्यांची मने जिंकत आहे. चाहत्यांसाठी त्याला असलेला आदर आणि प्रेम अनेकदा दिसून येतो. त्यामुळेच त्याचे अनेकदा कौतुकही होते. अलीकडेच कार्तिक आपल्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या संदर्भात अहमदाबादला गेला होता, तिथे त्याच्या चाहत्यांनी त्याचा पाठलाग केला त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी जमली होती. चाहत्यांची ती गर्दी कार्तिक आर्यनच्या कारपर्यंत पोहोचली. कार्तिक जात असताना त्याच्या मागून चाहत्यांची मोठी गर्दी होत होती आणि सर्वजण अभिनेत्याच्या नावाने घोषणा देत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये लोक कार्तिक आर्यनच्या नावाने घोषणा देत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. लोकांची गर्दी सांभाळण्यासाठी कार्तिकच्या अंगरक्षकांनाही खूप अडचणींचा सामना करावा लागला. व्हिडिओच्या शेवटी, कार्तिक आर्यन कार थांबतो आणि चाहत्यांकडे वळून त्यांना हाय करतो. कार्तिकने आपल्याला हाय केलेले पाहून चाहते खूपच खुश होतात.

इंडस्ट्रीत कोणाचेही पाठबळ नसताना तसेच कोणीही गॉडफादर नसताना अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपले जे स्थान बनवले आहे ते खूपच प्रेरणादायक आहे. एवढा मोठा कलाकार असूनही पाय अजूनही जमिनीवर असणे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळेच तो नेहमीच चाहत्यांची मने जिंकून घेण्यास यशस्वी होतो.

कार्तिक कधीही आपल्या कोणत्याही चाहत्याला भेटतो तेव्हा तो त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतो. काही दिवसांपूर्वीच तो विमानतळावर एका छोट्या चाहत्याला भेटला होता. कार्तिकच्या त्या छोट्या चाहत्याने विमानतळावर त्याच्या नावाचा जयघोष सुरू केला. त्यावेळी कार्तिकने आपले विमान चुकेल याची पर्वा न करता परत येऊन त्या मुलाची भेट घेतली. कार्तिकचा तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.