फिल्मी सिताऱ्यांचे पहिलं प्रेम… डोकवूया त...

फिल्मी सिताऱ्यांचे पहिलं प्रेम… डोकवूया त्यांच्या बालपणात (The Childhood Love Of Film Stars)

मागील काही दिवस बचपन का प्यार… हे गाणं धुमाकूळ घालत आहे आणि बरंच ट्रेंडमध्ये देखील आहे. सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत, सर्वच या गाण्यावर त्यांचे व्हिडिओ बनवत आहेत आणि शेअर करत आहेत. खरंच आहे पण, बालपणीचं प्रेम कोण कसं विसरू शकतं नाही का? लहानपणी एखाद्याबद्दल ओढ, आकर्षण, जिव्हाळा, प्रेम वाटलं असेल तर ते विसरता येणं शक्य नाही. मग ते कोणीही असो. काही व्यक्तींना फिल्मी सिताऱ्यांचे वा अन्य सेलिब्रिटींचे वेड असते…बहुतांशी सामान्य लोकांना फिल्मी सिताऱ्यांबद्दल वा एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीबद्दल प्रेम वा आकर्षण असू शकते. तर असे काही फिल्मी सितारे देखील आहेत की, जे अजूनही आपलं बालपणीचं प्रेम विसरू शकले नाहीत. तेव्हा आपण आता अशा काही बॉलिवूडच्या कलाकारांच्या बालपणात डोकावून पाहणार आहोत.

Childhood Love Of Film Stars

आलिया भट्ट सध्या रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या लव्ह बर्डच्या प्रेमाची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. परंतु आलियाला लहानपणी शाहिद कपूर आवडत होता. शाहिदचा पहिला चित्रपट ‘इश्क विश्क’ पाहिल्यानंतर ती शाहिदच्या चक्क प्रेमातच पडली आणि त्याला पसंत करू लागली होती. आता ती रणबीर कपूरसोबत लग्न करणार आहे, ही गोष्ट वेगळी. आलियाने शाहिदसोबत अनेक चित्रपट केले आहेत. तिला तिच्या बालपणीच्या पहिल्या प्रेमासोबत काम करण्याची संधी मिळाली, ही तिच्यासाठी अतिशय आनंदाची पर्वणी होती.

Childhood Love Of Film Stars

सलमान खानची प्रेमप्रकरणं आणि त्याची अफेअर्स कोणापासून लपलेली नाहीत. त्याच्या लव्ह स्टोरीजमध्ये अनेक नावं आहेत. संगीता बिजलानी, सोमी अली ते कतरिना कैफ, एश्वर्या पर्यंत. परंतु तु्म्हाला माहीत आहे; बालपणी सलमान खान अभिनेत्री रेखा यांना पसंत करायचा. रेखा त्याचं पहिलं प्रेम आहे.  

Childhood Love Of Film Stars

अनेकदा त्याने आपल्या मुलाखतींमध्ये याबाबत उल्लेख केला आहे. आणि योगायोग म्हणजे सलमान खानचा पहिला चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’ मध्ये रेखा नायिका होती आणि सलमान सहाय्यकाच्या छोट्या भूमिकेत होता. कदाचित रेखासाठी सलमानने पहिल्याच चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची छोटीशीच भूमिका स्वीकारली असावी.

Childhood Love Of Film Stars

Childhood Love Of Film Stars

रणबीर कपूरला दिलफेंक आशिक असंच म्हटलं जातं. कारण त्याचं एका व्यक्तीबद्दलचं प्रेम ओसरत नाही तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम जडतं. त्याच्या जीवनात अनेक मुली, तारका आल्या आणि गेल्या… त्याचं प्रेम सतत बदलत राहिलं… परंतु जेव्हापासून आलिया भट्ट त्याच्या जीवनात आली आहे, रणबीर प्रेमाबाबत गंभीर होऊ लागला आहे, असं दिसतंय. लवकरच तो आलियाशी लग्नही करणार आहे. रणबीर कपूरला याआधी दीपिका पादुकोण, कतरिना कैफ अशा टॉपच्या नायिकांचं प्रेमही मिळालं आहे.

Childhood Love Of Film Stars

परंतु प्रेमवीर रणबीर कपूर बालपणापासून माधुरी दीक्षितचा दिवाना होता. त्याच्या एका चित्रपटातील घाघरा…  या आयटम सॉन्गमध्ये माधुरी दीक्षितने त्याला उत्तम साथ दिली होती आणि रणबीर अतिशय खूश झाला होता. रणबीर त्यावेळेस माधुरीबद्दल बऱ्याच गोष्टी करायचा. माधुरीचेही बालपणीचे प्रेम होते, ज्याच्या सोबत माधुरीला लग्नही करायचे होते, परंतु ते शक्य झाले नाही.

Childhood Love Of Film Stars

करीना कपूरसाठी वेडे असणाऱ्यांची अजिबातच कमी नाही. तिच्या चाहत्यांचाही तिच्यावर जीव आहे. ती पती सैफ अली खान वा तैमूर आणि जहांगीर सोबत का असेना, पण एकदा तरी करीनाची छबी पाहण्यासाठी चाहते बेताब असतात.

Childhood Love Of Film Stars

तर करीना दीर्घकाळापासून हॉलीवुडचा हँडसम हंक अभिनेता लियोनार्डो डिकैप्रियोची जबरदस्त चाहती आहे. लियोनार्डोची हरेक स्टाइल तिला वेड लावते. हे जाणून घेतल्यानंतर कदाचित करीनाच्या चाहत्यांना वाईट वाटण्याची शक्यता आहे, पण बोलतात ना ‘इश्क पर जोर नहीं गालिब जलाए ना जले बुझाए ना बुझे…’  अर्थात चाहते जिला पसंत करतात, ती करीना मात्र साता समुद्रापार असलेल्या कोणा दुसऱ्यालाच पसंत करते.

Childhood Love Of Film Stars

रोमांसचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानची गौरीसोबतची प्रेम कहाणी अतिशय रंजक आहे. आणि तसंही शाहरुखच्या चित्रपटांतील सर्वच प्रेम कहाण्या सुपर-डुपर हिट ठरल्या आहेत. प्रियकर म्हणून त्याने चाहत्यांस खूपच खूश केले आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असो, दीवाना, वा डर, मोहब्बतें… यातील प्रत्येक पात्राने एक नवीन कहाणी रचली. प्रेमाचा नवा अंदाज दर्शविला, ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. पण हाच शाहरुख बालपणी अभिनेत्री मुमताज ह्यांना खूप पसंत करायचा. तो त्यांच्यासाठी दिवाना झाला होता.

Childhood Love Of Film Stars

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम