‘बाहुबली २’ आज मराठी भाषेत प्रदर्शि...

‘बाहुबली २’ आज मराठी भाषेत प्रदर्शित (The Big ‘Bahubali 2’ Releasing Today In Marathi)

‘बाहुबली’ हा गाजलेला भव्यदिव्य चित्रपट हिंदी व दक्षिणेकडील सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. तो मराठीत आणण्याचे धाडस शेमारू मराठी बाणा, या चॅनलने केले. दिवाळीच्या शुभ मुहूतावर शेमारूने ‘बाहुबली’ मराठीत प्रदर्शित केला. त्याला प्रेक्षकांनी अपेक्षित ती चांगली दाद दिली.

आज ‘बाहुबली २’ अर्थात बाहुबली द कनक्ल्युजन मराठी भाषेत प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे डॉ. अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, संस्कृती बालगुडे, उदय सबनीस यांनी आपल्या आवाजांनी बाहुबली मधील व्यक्तीरेखा मराठी भाषेत पुनरुज्जीवित केल्या आहेत. त्यामुळे एक अजरामर कलाकृती आपल्या ओळखीच्या आवाजात अनुभवता येण्याचा आनंद मराठी प्रेक्षकांना मिळत आहे. मुळातच यशस्वी ठरलेलं बाहुबलीचं संगीत मराठीमध्ये आणण्याचं काम संगीतकार कौशन इनामदार यांनी पार पाडलं आहे. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांनी ही गाणी गायली आहेत.