‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये शाहरुख खान...

‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये शाहरुख खान सोबत काम करण्यास नकार दिलेली नटी ….. कारण काय होत? (The Actress Who Refused To Work With Shahrukh Khan In “Chennai Express : What Was The Reason)

शाहरुख खान, आज अशा यशोशिखरावर आहे की, जवळपास सर्वच अभिनेत्री त्याच्या सोबत काम करायला उत्सुक असतात. पण यामध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जिने ‘चेन्नई एक्सप्रेस’ मध्ये त्याच्याबरोबर काम करायला साफ नकार दिला होता. ती दाक्षिणात्य अभिनेत्री आहे…. काय कारण होतं की, या पठ्ठीने शाहरुख सोबत काम करण्यास नकार देण्याची हिंमत दाखवली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
ही अभनेत्री आहे. दक्षिणेतील सुपरस्टार नयनतारा!
‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यासाठी तिला विचारण्यात आलं होत. पण तिनं विनम्रपणे नकार दिला. मग ही भूमिका प्रियामणीने केली.
शाहरुख आणि दीपिका पदुकोण या जोडीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. जवळपास ४०० कोटी रुपयांचा धंदा या चित्रपटाने केला होता. हे यश पाहून नयनताराला आपल्या नकाराचा पच्छाताप झाला असावा.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
नयनतारा ने ही सुपरस्टार रजनीकांत सोबत ‘अन्नात्थ्ये’ या चित्रपटात अलिकडेच नायिका साकारली होती. ती तामीळ, तेलुगु, आणि मल्याळम चित्रपटातून कामे केले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
शाहरुख खानचा ‘झिरो’ हा अलिकडे आलेला शेवटचा चित्रपट ठरला. आता ‘पठाण’ या बडया चित्रपटात तो आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.­­­