गायिका नेहा भसीनला या जन्मात आई व्हायचे नाही, क...

गायिका नेहा भसीनला या जन्मात आई व्हायचे नाही, कारण ऐकून व्हाल थक्क (That’s Why Singer Neha Bhasin Does not Want to Become a Mother in Her Life, You Will be Stunned to Know The Reason)

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखली जाते. ‘जग घुमाया’ हे गाणे गाऊन लोकांची मने जिंकणाऱ्या नेहा भसीन हिने नुकताच आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. नेहा आपला पती समीरुद्दीनसोबत वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहे. तसेच ती आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची तयारी करत आहे. पण जेव्हा फॅमिली प्लॅनिंगचा प्रश्न विचारला जातो तेव्हा नेहा, मला या जन्मात तरी आई व्हायचे नाही असे सरळ सांगून मोकळी होते. तिने यामागचे कारणही सांगितले.

नेहा आपल्या आयुष्याची 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही खूप आनंदी आहे. वयाच्या या टप्प्यात आल्यानंतर, इंग्रजी अल्बम असो किंवा वर्ल्ड टूर, ती आपली प्रत्येक स्वप्न साकार करण्याच्या तयारीमध्ये व्यस्त असते. नेहाला जेव्हा तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, की, मला या जन्मात तरी आई व्हायचे नाही.

मुलाला जन्म देण्याऐवजी मला अनाथाश्रम हवे आहे जिथे मी किमान 10 ते 12 मुलांचे संगोपन करू शकेन. त्या मुलांच्या चांगल्या संगोपनासोबतच शिक्षण, प्रेम आणि योग्य जीवन देऊ शकेन.

मिळालेल्या माहितीनुसार नेहाने कधीही स्वतःची मुले होण्याची स्वप्न पाहिले नाही, परंतु तिला अनाथ मुलांबद्दल नेहमीच खूप आपलुकी वाटते.

नेहाने सांगितले की, माझे लहानपणापासूनच ठरले होते की, मी स्वत:चे मूल जन्माला घालण्याऐवजी एखाद्याला दत्तक घेईन पण नंतर माझ्या लक्षात आले की एक मूल दत्तक घेण्याऐवजी काहीतरी मोठे का करू नये? येत्या दोन-तीन वर्षांत या संदर्भात काम सुरू करणार असल्याचेही तिने सांगितले.

 नेहा भसीन 2021 मध्ये टीव्ही रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाली होती. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर ती ‘बिग बॉस 15’मध्येही दिसली होती. . बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. परंतु आज ती सर्व नकारात्मक गोष्टींमधून बाहेर आली आहे.

दिल्लीच्या पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नेहा भसीनला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. शालेय जीवनातही तिने अनेक गायनाच्या स्पर्धा जिंकल्याचे म्हटले जाते. नेहाने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकले आहे.

विशेष म्हणजे नेहाने ‘फॅशन’ चित्रपटात ‘कुछ खास है’, ‘सुलतान’ चित्रपटातील ‘जग घुमाया थारे जैसा ना कोई’, ‘भारत’ चित्रपटातील ‘मीठी-मीठी चश्नी’ आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटात धुनकी यांसारखी हिट गाणी गायली आहेत. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त नेहाने तेलुगू आणि पंजाबी गाणीही गायली आहेत.