साक्षी तन्वरला आजही या कारणामुळे व्हावे लागते ख...

साक्षी तन्वरला आजही या कारणामुळे व्हावे लागते खजील (That’s Why Sakshi Tanwar Face Embarrassment Even Today, People Have not Forgotten This Feat of Actress)

छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून प्रसिद्ध असलेली साक्षी तन्वर आज मोठ्या पडद्यावरही खूप लोकप्रिय आहे. हिट मालिकांमध्ये काम केल्यानंतर साक्षी अनेक चित्रपटांमध्येही दिसली. 50 वर्षीय साक्षी तन्वरची छोटया पडद्यावरील प्रेक्षकांमध्ये आजही एक आदर्श सून म्हणून ओळख आहे, पण तरीही या अभिनेत्रीला एका गोष्टीमुळे खजील व्हावे लागते. आजही लोक तिचा तो पराक्रम विसरलेले नाहीत.

साक्षी एक उत्तम अभिनेत्री आहे आणि तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी नेहमीच कौतुक केले आहे यात शंका नाही. साक्षी तन्वरचे वडील राजेंद्र सिंह तन्वर, हे राजस्थानमधील अलवर येथील आहेत,ते निवृत्त सीबीआय अधिकारी आहेत. वडिलांच्या बदलीमुळे साक्षीने वेगवेगळ्या शहरात शिक्षण घेतले. तिने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. तिने ड्रामा सोसायटीची अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे.  

जेव्हा साक्षी मास कम्युनिकेशनची तयारी करत होती, तेव्हा तिने ‘अलबेला सूर मेला’ शोच्या संचालकपदासाठी ऑडिशन दिले आणि तिथून छोट्या पडद्यावर तिच्या करीअरला सुरुवात झाली. यानंतर साक्षीने ‘दस्तूर’ या मालिकेत काम केले आणि त्यानंतर ती ‘एहसास’, ‘एक्स-झोन’, ‘भंवर’ सारख्या शोमध्ये दिसली. मात्र, एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ या शोमध्ये पार्वतीची भूमिका साकारून साक्षीला खरी ओळख मिळाली.

‘कहानी घर घर की’ मधून लोकप्रिय झाल्यानंतर साक्षीला बडे अच्छे लगते हैं या मालिकेची ऑफर मिळाली. त्यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या मालिकेत साक्षीसोबत राम कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. आजही या मालिकेतील एका दृश्यासाठी साक्षीला खूप खजील व्हावे लागले होते.

या सीरियलमध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यात एक रोमँटिक किस सीन शूट करण्यात आला होता, जो सुमारे 17 मिनिटांचा होता. राम कपूर आणि साक्षी तन्वरचा हा किसिंग सीन छोट्या पडद्याच्या इतिहासातला सर्वात लांब किसिंग सीन होता असं म्हटलं जातं. दोन्ही कलाकारांचे लिपलॉक आणि इंटिमेट सीन इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यातील या इंटिमेट सीनवरून बराच गदारोळ झाला होता, त्यानंतर एकता कपूरने माफी मागितली होती. इंटिमेट सीन चित्रीत करण्यात आले ही माझी चूक असल्याचे एकताने म्हटले होते, परंतु टीव्हीच्या आदर्श सुनेचे हे नवे रुप प्रेक्षकांना आवडले नाही, त्यानंतर शोचे रेटिंगही घसरले. या शोला दहा वर्षे झाली. या शोचा दुसरा सीझनही आला मात्र तो मागील सीझनला टक्कर देऊ शकला नाही.

विशेष म्हणजे साक्षीने मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. साक्षीने अनेक मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ती अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’, आमिर खानसोबत ‘दबंग’ आणि सनी देओलसोबत ‘मोहल्ला अस्सी’मध्ये दिसली आहे.