प्रियंका चोप्राने अन्नू कपूरसोबत इंटीमेट सीन कर...
प्रियंका चोप्राने अन्नू कपूरसोबत इंटीमेट सीन करण्यास दिला होता नकार, अभिनेत्याने स्वत: सांगितले कारण (That’s Why Desigirl Priyanka Chopra Refused to do an Intimate Scene with Annu Kapoor, Actor told the Reason)

बॉलिवूड इंडस्ट्रीपासून हॉलिवूडपर्यंत आपले नाव गाजवणारी प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार बनली आहे. प्रियांका चोप्राने एकापेक्षा एक अशा सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. पण एका चित्रपटात तिने अन्नू कपूरसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला होता. एका इंटिमेट सीनच्या शूटिंगवरुन अन्नू कपूर आणि प्रियांका चोप्रामध्ये वाद झाला होता. अखेर, प्रियांकाने अन्नू कपूरसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला. तेव्हा नक्की काय घडले होते त्याबद्दल अभिनेत्रीने स्वत: खुलासा केला.

६६ वर्षीय अन्नू कपूर एक उत्कृष्ट अभिनेता असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियंका चोप्रासोबतच्या इंटिमेट सीनवरून झालेल्या वादाबद्दल अन्नू कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सात खून माफ’ या चित्रपटात जेव्हा ते अभिनेत्रीसोबत काम करत होते तेव्हा प्रियांकाच्या 7 ऑनस्क्रीन पतींमध्ये ते पाचवे पती होते. कीमा लाल असे त्या भूमिकेचे नाव होते.

या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि अन्नू कपूर यांच्यात एक इंटिमेट सीन शूट होणार होता, पण प्रियांकाने त्यांच्यासोबत इंटीमेट सीन करण्यास साफ नकार दिला. याचे कारण सांगताना अन्नू कपूरने सांगितले होते की, मी कदाचित चांगला दिसत नाही किंवा मी फिट हिरोसारखा दिसत नाही त्यामुळे प्रियांकाने माझ्यासोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला असावा.

अन्नू कपूर म्हणाले होते की जर मी हिरो असतो तर प्रियंका चोप्रा माझ्यासोबत इंटिमेट सीन करायला तयार झाली असती. मात्र, प्रियांकाने नकार दिल्यानंतर अन्नू कपूर आणि अभिनेत्री यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. प्रियांकाने अन्नू कपूरसोबत इंटिमेट सीन करण्यास नकार दिला असला तरी, 66 वर्षीय अन्नू कपूरने अल्ट बालाजीच्या ‘पौरुषपूर’ या वेबसिरीजमध्ये स्वतःहून अनेक वर्षांनी लहान अभिनेत्री अस्मिता बक्षीसोबत इंटिमेट सीन शूट केले.

अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी 1992 मध्ये अनुपमा पटेल यांच्याशी लग्न केले, परंतु लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अन्नू कपूरने 1995 मध्ये अरुणिता मुखर्जीसोबत लग्न केले. त्यांना दोन लग्नांतून 4 मुले आहेत. अन्नूचे दुसरे लग्न 10 वर्षे टिकले आणि 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

असे म्हटले जाते की, आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अन्नू कपूरची पुन्हा एकदा त्यांच्या पहिल्या पत्नीशी जवळीक निर्माण झाली आणि 2008 मध्ये दोघेही पुन्हा एकत्र राहू लागले, त्यानंतर त्यांनी पुन्हा पहिल्या पत्नीशी लग्न केले. अन्नू कपूर यांचे खरे नाव अनिल कपूर आहे, पण इंडस्ट्रीत या नावाचा कलाकार आधीपासूनच होता, त्यामुळे त्यांनी आपले नाव बदलून अन्नू कपूर ठेवले.