आलिया आणि रणबीरने लग्नाआधीच लिव्ह-इन रिलेशनशिपम...

आलिया आणि रणबीरने लग्नाआधीच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय का घेतला होता ? अभिनेत्रीने केला खुलासा(That’s Why Alia Bhatt Decided to be in a Live-in Relationship With Ranbir Kapoor Before Marriage)

अभिनेत्री आलिया भट्टने जुलै महिन्यात ती आणि रणबीर आईबाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावरुन दिली होती. सध्या आलिया आपल्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. रणबीर आणि आलिया लग्नापूर्वी पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी ते एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहत होते. आलियाने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आपण लग्नाआधीच रणबीरसोबत लिव्ह इनमध्ये का राहत होतो याचा खुलासा केला.

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ ला लग्न केले आणि लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच आलियाने तिच्या प्रेग्नंसीची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

त्यानंतर ते दोघे पहिल्यांदा ६ ऑगस्टला एकत्र कॅमेऱ्यासमोर आले. त्यावेळी आलियाचा बेबी बंप स्पष्ट दिसत होता. आपल्या पतीसोबत कॅमेऱ्यासमोर पोज देताना आलियाने बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आलिया भट्टने तिच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल सांगितले, ती म्हणाली की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहून लोक एकमेकांना चांगले जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते भविष्यात एकमेकांसोबत अधिक आरामात राहू शकतात. या प्रक्रियेत त्यांच्या एकमेकांसोबत अनेक आठवणी बनतात. तसेच लग्न करण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. त्यात आपण एकमेकांना समजून घेत आपण खूप आठवणी तयार करतो. तेही कोणत्याही दबावाविना.

आलिया पुढे म्हणाली की, तिला याआधीच रणबीरसोबत लग्न करायचे होते. मात्र मध्यंतरी संपूर्ण जगाला कोरोना महामारीचा फटका बसला होता. अशा परिस्थितीत आम्ही एकत्र राहण्याचा विचार केला. महामारीच्या काळातच आम्ही लिव्ह-इनमध्ये राहायला लागलो. या मागे आमच्यातले नाते आणखी घट्ट व्हावे आणि आम्ही एकमेकांना समजून घ्यावे हाच हेतू होता.

आलियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘आस्क मी एनीथिंग’ हे सेशन घेतले होते. त्यावेळी एका व्यक्तीने तिला विचारले की, सहकलाकार म्हणून रणबीरमधील वैशिष्ट्ये कोणती ?यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्रीने तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीरचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोत रणबीरने हाताने ह्रदयाचा आकार बनवला होता. या फोटोवर तिने लिहिले की, एक अभिनेता म्हणून माझे रणबीरवर खूप प्रेम आणि आदर आहे.