अक्षय कुमार राणी मुखर्जीवर खार खाऊन आहे, म्हणून...

अक्षय कुमार राणी मुखर्जीवर खार खाऊन आहे, म्हणून तिच्यासोबत काम करत नाही (That’s Why Akshay Kumar Does Not Do Films With Rani Mukerjee, You Would Be Surprised To Know The Reason)

‘बच्चन पांडे’ या आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये अक्षय कुमार सध्या गुंग आहे. त्याचे चाहते देखील उत्सुकतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत. यावरून एक किस्सा आठवला आहे…

अक्षय कुमार हा चित्रसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी कलाकार आहे. तो वर्षभरात ४-५ चित्रपट करतो. अन्‌ निर्मात्याला बक्कळ पैसा मिळवून देतो. अक्षयने आपल्या कारकिर्दीत अव्वल दर्जाच्या तसेच नव्या दमाच्या अभिनेत्रींसोबत कामे केलीत. अक्षय सोबत काम केल्याने नव्या अभिनेत्रींना भरपूर नाव मिळाले. पण सर्व टॉपच्या अभिनेत्रींसोबत काम करून देखील त्याने राणी मुखर्जी सोबत काम केले नाही. त्याचं एक कारण आहे…

अक्षय कुमार आज लोकप्रियतेच्या शिखरावर असला तरी सुरुवातीच्या काळात त्याला बरीच धडपड करावी लागली होती. या संघर्षाच्या काळातच राणी मुखर्जीने त्याच्याशी पंगा घेतला. त्यामुळे तो आजपर्यंत तिच्यावर खार खाऊन आहे अन्‌ तिच्यासोबत चित्रपट करत नाहिये.

आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अक्षय कुमारला लोक नायकाची भूमिका देऊन राणी नकार देत असे. कारण तेव्हा राणी यशस्वी अभिनेत्री होती. अन्‌ नव्या नायकाबरोबर काम करणे तिला कमीपणाचे वाटत होते.

आता हेच बघा ना! ‘खिलाडियों के खिलाडी’ हा अक्षयचा एक हिट चित्रपट आहे. त्यामध्ये त्याची नायिका झाली रविना टंडन. रविनाच्या आधी निर्माते राणी मुखर्जीला घ्यायला निघाले होते. पण अक्षयचं नाव ऐकताच राणीने हा चित्रपट करायला सपशेल नकार दिला. याशिवाय ‘संघर्ष’ आणि  ‘आवारा, पागल दिवाना’ हे चित्रपट देखील राणीकडे आले होते. पण राणीने ते नाकारले. त्यामुळेच हे दोघे एकत्र येऊ शकले नाहीत.