सारा अली खानला येतेय सुशांत सिॆंह राजपूतसोबतच्य...

सारा अली खानला येतेय सुशांत सिॆंह राजपूतसोबतच्या चुंबनाची आठवण, तो प्रसंग आठवून आजही होते भावूक (That kiss of Sara Ali Khan and Sushant Singh Rajput, Even Today She gets Emotional Remembering Him)

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खानने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसला होता. प्रेक्षकांनाही त्यांची जोडी फार आवडली. असे म्हटले जाते की, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली होती. दोघांमध्ये एक किसिंग सीनही शूट करण्यात आला होता. सुशांतसोबतचे ते चुंबन साराला अजूनही आठवते. अभिनेत्रीने एका मुलाखतीत त्या दृश्याविषयी एक अतिशय मनोरंजक किस्सा सांगितला.

स्क्रिप्टच्या मागणीनुसार बोल्ड सीन्स देण्यास किंवा बिकीनी घालण्यास साराला काहीच हरकत नसते. ‘केदारनाथ’ चित्रपटात सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यात एक रोमँटिक किसिंग सीन शूट करण्यात आला होता. त्या सीनची आठवण आली की अभिनेत्री आजही भावूक होते.

साराने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुशांतसोबत केलेले किसिंग सीन खूप सोपे होते. यामागचे कारण म्हणजे जेव्हा डोळे मिटलेले असतात आणि तुम्ही एखाद्याचे चुंबन घेता तेव्हा तो प्रेम दाखवण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. या चित्रपटादरम्यान, सारा आणि सुशांतच्या डेटींगच्या बातम्याही समोर आल्या होत्या, परंतु दोघांनीही याबद्दल काहीही सांगितले नाही.

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सारा आणि सुशांत एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे, जेव्हाही त्यांना शूटिंगमधून वेळ मिळायचा तेव्हा ते फिरायला जायचे. त्यामुळे दोघांमधील जवळीक वाढू लागली. सेटवरील लोकांनाही या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, असे वाटू लागले होते.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साराने सुशांतचे खूप मनापासून कौतुक केले होते. ती प्रत्येक मुलाखतीत सुशांतकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचे सांगायची. या चित्रपटात सुशांत आणि साराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सारा आणि सुशांत थायलंडच्या सहलीला गेले होते. याशिवाय सारा अनेकदा सुशांतच्या फार्म हाऊसवर जायची.

सुशांत सिंह राजपूतने 2020 मध्ये वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. सारा अजूनही सुशांतला खूप मिस करते. अलीकडेच, सुशांतच्या वाढदिवशी, साराने खास वाढदिवसाचा केक कापून साजरा केला. सध्या सारा अली खानचे नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडले जात असून दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत.