मुलींचा उल्लेख ‘माल’ असा केला म्हणून तेजस्वी प्...

मुलींचा उल्लेख ‘माल’ असा केला म्हणून तेजस्वी प्रकाशने विशाल कोटियनवर केली आगपाखड; करण कुंद्राला पण दिली तंबी (Tejasswi Prakash Slams Vishal Kotian For Calling Her ‘Maal’)

बिग बॉसच्या घरात विशाल आणि तेजस्वी यांच्यात मैत्रीचे नाते असले तरी, विशालने मुलींना ‘माल’ म्हटलेले तेजस्वीला अजिबात आवडले नाही. विशालने हा शब्द शमितासाठी वापरल्याचे कळल्यानंतर तर, तेजस्वीने विशालला त्याचा जाबच विचारला; तेव्हा विशालने तिला सांगितले की, तो हा शब्द नेहा आणि तिच्यासाठी म्हणजे तेजस्वीसाठीही वापरतो.

हे ऐकून तर तेजाला खूप राग येतो आणि ती त्याला सांगते की, कोणत्याही मुलीसाठी अतिशय आक्षेपार्ह असा हा शब्द आहे आणि तो तू वापरू शकत नाही. हे ती त्याला सांगत असतानाच मध्ये पडत करण कुंद्रा तेजस्वीला देखील गंमतीने तेजस्वी ही त्याचा माल आहे आणि विशाल तिला आपला माल म्हणू शकत नाही, असे म्हणतो.

हे ऐकून तेजस्वी करणची देखील खरडपट्टी काढते आणि दोघांनाही समजावते की, तुम्ही दोघे माझे मित्र आहात आणि मी तुम्हा दोघांवर प्रेम करते. परंतु हा शब्द कोणत्याही मुलीसाठी अतिशय अपमानास्पद आहे. हे मी खरं तर तुम्हाला प्रेमाने समजावून सांगत आहे, नाहीतर मला दुसऱ्या भाषेतही समज देता येते, अशी तंबीच तिने करणला दिली आहे.

तेजाचा राग पाहून विशाल स्वतःची बाजू मांडताना तेजाला म्हणतो की, हा शब्द इतका वाईट नाही आणि त्याने तो चुकीच्या पद्धतीने वापरला नाही. तू चीज बडी है मस्त-मस्त… अशी गाणी बनवलेली चालतात…  हे ऐकल्यानंतर तर राग अनावर झालेल्या तेजस्वीने विशालवर, तूम्ही मुलींना चीज समजू शकत नाही आणि ती गाणी जेव्हा बनवली गेली असतील तेव्हा असतील, पण हा विषय येथेच संपव, त्यावर वाद घालू नकोस, अशी आगपाखड केली. तेव्हा करणनेही तेजस्वीचा मुद्दा तिच्या जागी बरोबर असल्याचे विशालला सांगितले.

याआधीही विशालने राकेश बापटला शमितावरून बोलताना, तू भलताच लांब हात मारला आहेस असे म्हटले होते. आणि ही बाब पत्रकार परिषदेच्या टास्कदरम्यान समोर आली, तेव्हा शमिताने हात मारण्याचा अर्थ काय आहे, असे विशालला विचारले होते. तेव्हा विशालने सांगितले की, ती त्याची भाषा आहे. पण असं बोलण्यामागे त्याचा काही वाईट हेतू नाही… कुणाला वाईट वाटले असेल तर हात जोडून माफी मागतो…

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम (सर्व फोटो)