तेजस्वी प्रकाशला शाळेत असताना बॉडी शेंमिगचा प्र...

तेजस्वी प्रकाशला शाळेत असताना बॉडी शेंमिगचा प्रकार सहन करावा लागला होता (Tejasswi Prakash Opens Up About Being Skinny-Shamed In School, Actress Says- ‘My Schoolmates Used To Call Me A Hanger…’)

बिग बॉस 15ची विजेती आणि टीव्हीवरील क्यूट नागिण तेजस्वी प्रकाश आपल्या हॉट लूकने नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. पण एक काळ असा होता जेव्हा तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. याबाबत तेजस्वीने स्वत: खुलासा केला की, ती शाळेत असताना खूप बारीक असल्यामुळे तिला खूप चिडवले जायचे.

एका मुलाखतीत तेजस्वीने सांगितले की, शाळेच्या दिवसात मी खूप बारीक होते आणि त्यामुळे सर्व मुले मला हॅन्गर म्हणायचे. मी इतकी बारीक होते की मैदानात खेळायला जायचे तेव्हा सगळे मला पाच रुपयांचे नाणे खिशात ठेव नाहीतर उडून जाशील असे म्हणायचे.

तेजस्वीने दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेजस्वी उच्चशिक्षित असून ती एक क्लासिकल डान्सर आहे. तिचा जन्म सौदी अरेबियातील जेद्दाह येथे एका संगीतमय कुटुंबात झाला. पण तिचे बालपण मुंबईत गेले. तिने लाइफ ओकेच्या 2612 शोमधून पदार्पण केले. पण संस्कार-धरोहर अपनों की या मालिकेतून तिला ओळख मिळाली. ती स्वरागिनीमध्येही दिसली होती.

पुढे तेजस्वी पेहरेदार पिया की या मालिकेमुळे वादात सापडली होती.  या मालिकेची कथा आणि संकल्पना पाहून सर्वजण नाराज होते, मालिकेत एका नऊ वर्षांच्या मुलाने अठरा वर्षांच्या मुलीशी लग्न केल्याचे दाखविले होते. प्रेक्षकांच्या नाराजीमुळे ही मालिका लवकर बंद केली गेली. खतरों के खिलाडी 10 या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली आहे.

सध्या तिची करण कुंद्रासोबतची केमिस्ट्री लोकांना खूप आवडत आहे. या दोघांची ओळख बिग बॉसमध्ये झाली होती. तिथेच यांच्यातील जवळीक वाढली.