नशेच्या धूंदीत तेजस्वी चढली बॉयफ्रेंड करण कुंद्...

नशेच्या धूंदीत तेजस्वी चढली बॉयफ्रेंड करण कुंद्राच्या कडेवर, युजर्सनी केले जोरदार ट्रोल (Tejasswi Prakash Gets Trolled On Her Birthday For Being Over Dramatic And Climbing Onto The Lap Of Boyfriend Karan Kundrra, Watch Viral Video)

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिचा २९ वा वाढदिवस बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत गोव्याला साजरा करत आहे. पण वाढदिवसाच्या आदल्या रात्री तेजस्वी जरा जास्तच उत्साहीत झाली होती. आणि आनंदाच्या भरात आजूबाजूचे भान न राखता ती थेट बॉयफ्रेंड करण कुंद्राच्या कडेवर चढली. करण खूप वेळ त्याचा तोल सांभाळत तिला कडेवर घेऊन उभा असतानाच  अचानक मिडियावाल्यांनी तिथे गर्दी केली.

तेजस्वी लहान मुलासारखी करणच्या कडेवर चढून बसली होती आणि करणसुद्धा तिचे लाड पुरवण्यात कोणतीच कसर सोडत नव्हता. पण त्यांच्या या खासगी क्षणांवर मीडिया लक्ष ठेवून असल्याची दोघांना कल्पनादेखील नव्हती. तेजस्वीने पिंक कलरचा वनपीस व करणने व्हाईट टीशर्ट आणि डेनिम घातली होती. सोशल मीडियावर त्यांचा हा रोमॅण्टीक अंदाजातील व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकरी कमेंटस् करत आहेत. त्यात काहींना तेजस्वी खूप गोड दिसत असून काहींना ती अटेंशन सिकर वाटते.

पण खरेतर तेजस्वीची चप्पल हरवली होती व तिला तिचे पाय खराब करायचे नव्हते. त्यामुळे ती करणच्या कडेवर चढून बसली होती. करण आणि तेजस्वी तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या मित्रमंडळींना देखील चप्पल शोधण्यास सांगत होते. करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांना ते फोटो खूपच आवडले आहेत. तर काहींनी त्या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी असे एकमेकांना चिपकून उभे राहणे काहींना आवडले नाही त्यामुळे त्यांनी या जोडीला शो ऑफ करणारे कपल असे म्हटले आहे. शिवाय त्यांना सार्वजिनिक ठिकाणी योग्य वर्तन करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी मिडियाला त्यांच्या प्रायव्हर्सीचा सन्मान राखता आला पाहिजे असे म्हणत तेजस्वी आणि प्रकाशची बाजू घेतली आहे.