तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकरचा भाऊबीज स्प...

तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकरचा भाऊबीज स्पेशल लघुपट (Tejashree Pradhan And Abhijeet Khandkekar Excels In Bhau Beej Special Docudrama)

पुरुषांचा शर्टिंग ब्रॅंड ‘कॉटन किंग’ यांनी या भाऊबीजेला भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणारा ‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट प्रस्तुत केला आहे. प्रत्येक स्त्रीचं मन उलगडणारा हा लघुपट घर, कुटुंब आणि करिअर सांभाळणाऱ्या सर्व महिलांना समर्पित आहे. स्त्रियांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे सुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण करत आहे.

‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वर पाहायला मिळेल. अद्‌भुत क्रिएटीव्हज्‌ निर्मित हा लघुपट वैभव पंडित यांनी दिग्दर्शित केला आणि मोनिका धारणकर यांनी लिहिला आहे.

या लघुपटाची कथा अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी हा भाऊबीज लघुपट असला तरी कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.

कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे म्हणतात, “आम्ही पाहिले आहे की, आमच्या दुकानात अनेक स्त्रिया आपल्या भावांसाठी, पतींसाठी, वडिलांसाठी आणि मित्रांसाठी शर्ट खरेदी करण्यासाठी येतात; या निरीक्षणामुळे आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.”

अदभूत क्रिएटिव्हस्‌चे संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव पंडित म्हणतात, ”दिवाळीच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून महिलांच्या भावना व्यक्त करणारी माहितीमिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’’

“आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे मालक कौशिक मराठे यांनी सांगितले.

चला, तर मग या लघुपटाच्या निमित्ताने थोडे आणखी समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!