भाऊ कदमचा ‘डबल रोल’ असलेल्या घे डबल...

भाऊ कदमचा ‘डबल रोल’ असलेल्या घे डबल या विनोदी चित्रपटाचे टीझर प्रदर्शित(Teaser Of Ghe Double Comedy Marathi Film Released: Bhau Kadam Excels In Double Role)

येत्या ३० सप्टेंबरपासून सर्वत्र डब्बल कॉमेडीची हवा होणार आहे, कारण निमित्त आहे अभिनेते भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची दुहेरी भूमिका असणाऱ्या ‘घे डबल’ या चित्रपटाचं. जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ चित्रपटाचे भन्नाट टीझर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पोस्टरवरील भाऊ आणि भूषण यांच्या डबल रोलविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आज याच चित्रपटाचा टीझर सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

विश्वास जोशी यांनी ‘घे डबल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमधून आपल्या खळखळून हसवण्यासाठी सज्ज असणाऱ्या या चित्रपटात कॉमेडी किंग भाऊ कदम आणि अभिनेता भूषण पाटील बरोबरच छाया कदम, भारत गणेशपुरे, किशोर कदम, ओमकार भोजने, विद्याधर जोशी आणि संस्कृती बालगुडे अशी तगडी स्टारकास्टही पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच ‘घे डबल’ हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. त्यासोबतच, उत्तम कलाकारांची फळी असणार हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !”