तौक्ते चक्रीवादळाचा मुंबई व पश्चिम किनारपट्टीला...

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबई व पश्चिम किनारपट्टीला तडाखा : ‘तौक्ते’ चा अर्थ काय? (Tauktae Cyclone Hitting Western Coasts : What Is The Meaning Of ‘Tauktae’)

‘तौक्ते’ म्हणजे निसर्गात किंवा आपल्या घरात सापडणारी पाल. म्यानमार देशात या पालीला तौक्ते म्हणतात. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे. म्यानमार या देशाने हे नाव दिलं आहे. सरड्याची प्रजाती असलेल्या हायली व्होकल लिझार्ड (highly vocal lizard GECKO) अर्थात बोलका सरड्याच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो.
आपल्या कोकणाला आजपर्यंत  निसर्ग, क्यार, फियान, ओखी, मोरा, ओनिल, कॅटरिना, रिटा अशा वादळांनी तडाखा दिला आहे.

या वादळांना ही नावं कोण देतो, त्याचे अर्थ काय हे जाणून घेणे मजेशीर ठरेल. आपल्या उत्तर– हिंदी महासागराच्या क्षेत्रात येणाऱ्या भारत, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका, पाकिस्तान, थायलंड या देशानी एकत्र येऊन वादळाच्या नावाची एक यादी बनविली आहे. प्रत्येक देशाने आपल्याकडून नावाची लिस्ट या यादीसाठी दिली आहे.
उत्तर हिंदी महासागरातील  २००४ साली घोंघावणाऱ्या पहिल्या वादळाला *ओनिल हे नाव देण्यात आले होते. हे नाव भारतातर्फे देण्यात आले होते. नंतरच्या एका वादळाला *ओखी हे बांग्लादेशाने नाव सुचविले होते. *ओखी याचा बंगाली अर्थ डोळा असा आहे. मोरा वादळाला थायलंडने नाव दिले तर आता २०२१ मध्ये धडकणाऱ्या उत्तर हिद महासागरातील पहिल्या वादळाला *तौक्ते म्हणजे म्यानमार भाषेत पाल असे नाव देण्यात आले आहे. या वादळाला नाव देण्याची वेळ म्यानमारची होती. या पुढच्या वादळाला नाव देण्याचा मान भारताला मिळणार आहे.