तिळ आणि ओट्सचा केक (Tasty and healthy Til and O...

तिळ आणि ओट्सचा केक (Tasty and healthy Til and Oat meal Cake for Makar Sankranti)

मकर संक्रांतीसाठी नवी मुंबईच्या फोर पॉईंट्स बाय शेरेटन हॉटेलचे शेफ मेराज यांची तिळ आणि ओट्‌सचा केकची रेसिपी खास माझी सहेलीच्या वाचकांसाठी देत आहोत. ही रेसिपी चविष्ट आणि आरोग्यदायी आहे.

साहित्य

१/२ कप – पांढरे तिळ

१ १/३ कप – राजगिरा पीठ

१ कप – ओट्‌सचे जाडसर पीठ

१ १/३ कप – उकळवलेले पाणी

१/२ कप – बटर

३/४ कप – साखर (डार्क ब्राऊन शुगर)

२ – अंडी

१ टीस्पून – बेकिंग सोडा

१ टीस्पून – मीठ

१ टीस्पून – दालचिनी पावडर

१ टीस्पून- व्हॅनिला एसेन्स

फ्रॉस्टिंगसाठी

१ १/२ कप- डार्क ब्राऊन शुगर

६ टेबलस्पून बटर

१ टीस्पून- व्हॅनिला इसेन्स

१/४ कप- क्रीम

१/२ कप- अक्रोड

१/२ कप खोबऱ्याचे कापलेले काप

कृती

१. सर्व साहित्य एकत्र गोळा करा.

२. ओव्हन १७० डिग्री सेल्सिअस गरम करा. बेकिंग ट्रे ला तेल लावून (ग्रीस करून) बाजूला ठेवा.

३. एका भांड्यात ओट्‌सचे पीठ घ्या आणि त्यात उकळवलेले पाणी घाला. एकत्र करण्यासाठी नीट ढवळून घ्या आणि १५ मिनिटे राहू द्या.

४. मिक्सिंग बाऊलमध्ये १/२ कप बटर आणि साखर घालून एकत्र करा. मिश्रण हलके आणि फ्लफी होईपर्यंत फेटून घ्या.

५. अंडी, ओट्‌सचे मिश्रण, राजगिरा पीठ, बेकिंग सोडा, मीठ, तिळ, दालचिनी आणि व्हॅनिला इसेन्स घाला आणि पूर्णपणे मिसळेपर्यंत फेटून घ्या.

६. केकसाठीचे तयार मिश्रण बेकिंग डिशमध्ये घाला.

७. ४० मिनिटे बेक करा.

८. केक बेक होईपर्यंत फ्रॉस्टिंग मिश्रण एकत्र करा.

९. ओव्हनमधून केक बाहेर काढल्यानंतर, फ्रॉस्टिंग मिश्रण गरम केकच्या वरच्या बाजूला समान रीतीने पसरवा.

१०. केकला ब्रॉयलरपासून सुमारे इंचभर वर ठेवून वाफ द्या, जोपर्यंत ते फ्रॉस्टींग गोल्डन ब्राऊन होत नाही.

११. तिळ आणि ओट्‌सचा तयार केक थंड करून सर्व्ह करा.

  • फोर पॉईंट्स बाय शेरेटन हॉटेलचे शेफ मेराज