बॉलिवूडचा टारझन हेमंत बिर्जे आणि त्याची पत्नी क...

बॉलिवूडचा टारझन हेमंत बिर्जे आणि त्याची पत्नी कार अपघातात जखमी (Tarzan Actor Hemant Birje Injured In Car Accident)

बॉलिवूडचा टारझन अशी ख्याती पावलेला हेमंत बिर्जे  कार अपघातात जखमी झाला आहे. मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर त्याच्या कारला अपघात झाला. सोबत त्याची पत्नी व मुलगी होती.
मंगळवारच्या रात्री टोल प्लाझा नजीक हेमंत बिर्जेची कार डिव्हायडर वर आपटली. त्यामध्ये हेमंत आणि त्याची पत्नी यांना मार लागला. पण त्यांच्या प्रकृतीस धोका नाही. त्यांची मुलगी सुखरूप आहे. पवना हॉस्पिटलात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शिरगांव पोलीस ठाण्यातून ही खबर मिळाली आहे. हेमंत आणि त्याच्या पत्नीला थोडयाफार जखमा झाल्या आहेत. पण कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

हेमंत बिर्जेने ‘अडव्हेंचर्स ऑफ टारझन’ या चित्रपटात टारझनच्या भूमिकेतून पदार्पण  केलं. त्यानंतर तो लष्कर, आज के शोले, विराना, आज के अंगारे, तहखाना अशा चित्रपटात दिसला. पण टारझन सारखी लोकप्रियता त्यामधून मिळाली नाही.

टारझनने हेमंत बिर्जेला मोठं नाव मिळवून दिलं. त्यामध्ये त्याची नायिका किमी काटकर होती. त्याची ताडमाड उंची आणि दणकट शरीरयष्टी यामुळे टारझन म्हणून तो खूपच शोभला होता.