‘तारक मेहता’ चे जेठालाल घेत...

‘तारक मेहता’ चे जेठालाल घेतात सर्वात जास्त मानधन : इतरांचेही मानधन पाहा… (Tarak Mehta’s Jethalal Gets The Highest Remuneration : Know What Others Get)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टेलिव्हिजनवरील शो संपूर्ण भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. गेल्या तेरा वर्षांपासून या मालिकेतील कलाकार आपल्या दर्शकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. हे कलाकार त्यांच्या खऱ्या नावापेक्षा या मालिकेतील नावानेच ओळखले जातात. त्यामुळेच एखाद्या कलाकाराच्या जागी दुसऱ्या कलाकाराची दर्शक कल्पनाही करू शकत नाहीयेत. म्हणूनच यातील मुख्य पात्र असलेली दयाबेन डिक्टो तशीच मिळणं शक्य झालेलं नाही. तुमच्या सगळ्यांचे हे आवडते कलाकार मानधन म्हणून किती रक्कम घेतात याची काही कल्पना आहे का? नाही ना, पण जाणून घेण्याची इच्छा नक्कीच असणार, तर मग आपण यातीला काही कलाकारांना मिळणारं मानधन किती आहे ते जाणून घेऊया.

दिलीप जोशी (जेठालाल)

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत जेठालालची भूमिका प्रसिद्ध अभिनेता दिलीप जोशी यांने अमर केली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. तो ज्या पद्धतीने ही भूमिका साकारत आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. शोमध्ये त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी अभिनेता दिलीप जोशीला फी म्हणून १.५ लाख रुपये दिले जातात. तो या शोचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

मुनमुन दत्ता (बबीता जी)

बबिता जी या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता शोमध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही खूप लोकप्रिय आहे. शोमध्ये, बबिता जी ही व्यक्तिरेखा म्हणजे जेठालालचा विक पॉइंट दाखवला आहे. त्याचे हृदय तिच्यासाठी धडधडते, हे पाहताना चाहते खूश होतात. मुनमुन दत्ताला शोमधील प्रत्येक एपिसोडसाठी सुमारे ५० हजार रुपये दिले जातात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अमित भट्ट (चंपक लाल)

शोमध्ये जेठालालच्या वडिलांची भूमिका करणारा अभिनेता अमित भट्टही लोकांना आवडतो. शोमध्ये अमित भट्टचे नाव चंपक लाल आहे आणि जेठालाल त्याला बापूजी म्हणतो. शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी अमित भट्टला ७०,००० – ८०,००० रुपये मिळतात.

शैलेश लोढा (मेहेता)

तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शैलेश लोढाला कोण ओळखत नाही. शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याला एक लाख रुपये फी म्हणून दिली जाते.

मंदार चांदवडकर (भिडे)

जेठालालच्या शेजाऱ्याची भूमिका करणारा गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी भिडे अर्थात अभिनेता मंदार चांदवडकर हा या शोच्या मुख्य कलाकारांपैकी एक आहे. त्याला प्रत्येक एपिसोडसाठी ८०,००० रुपये मानधन मिळते.

नुकतेच या शोमधील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक असलेल्या नट्टू काकांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच वेळी, शोमधील सर्वात प्रिय पात्र दयाबेन (दिशा वाकानी) देखील गेल्या अनेक वर्षांपासून शोमध्ये परतली नाही, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम