जेठालालच्या वाढदिवशी ‘तारक मेहता का उल्टा...

जेठालालच्या वाढदिवशी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ झाला सोशल मीडियावर ट्रेंड : चाहत्यांनी दिल्या विनोदी शुभेच्छा! (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah Is Trending On Jethalal’s Birthday, Fans Shared Funny Memes To Wish Dilip Joshi On His Birthday)

गेल्या काही वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी हिंदी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यातील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी दर्शकांना खूप हसवते. यातील जेठालालची भूमिका करणाऱ्या दिलीप जोशीने काल आपला ५३वा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्ताने त्याचे प्रचंड चाहते खूप खुश झाले होते आणि आपल्या आवडत्या कलाकाराला शुभेच्छा देत सुटले होते.

चाहत्यांनी दिलीप जोशीवर प्रेमाचा इतका वर्षाव केल्याने दिलीप आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका, असे दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड झाले. कोणी त्याला कॉमेडी लेजंड, तर कोणी कॉमेडी किंग म्हणून संबोधत आहेत. सतत इतकी वर्षे आमचं मनोरंजन केल्याबद्दल त्याचे आभार मानत आहेत. एका चाहत्याने तर म्हटलं की, सलमान खान सारखा सुपरस्टार देखील जेठालालच्या या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करतो, ही मोठी गोष्ट आहे. जेठालालने मोठे परिश्रम करत ही पायरी गाठली आहे.

बऱ्याच मीमबाजांनी जेठालालच्या वाढदिवशी आपल्या शैलीत अभिनंदन केले आहे. त्यांचे हे मजेदार मीम्स बघण्यासारखे आहेत :

मीमबाजांची ही पद्धत देखील बघा :