‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कला...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकारास चोरीच्या आरोपाखाली अटक (‘Tarak Mehta Ka Ooltah Chashma’ Actor Arrested by Police For Chain Snatching and Theft)

मनोरंजन

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी शोमध्ये परत येण्याची चाहते वाट पाहत असतानाच या मालिकेशी निगडीत एक बातमी ऐकावयास मिळत आहे. या मालिकेमध्ये छोटी-मोठी भूमिका करणारे मिराज वल्लभदास कापरी यांना सुरत येथे चैन ओढण्याच्या आणि चोरी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या कलाकाराच्या अपराधांना मुंबईतूनच सुरुवात झाली होती, असं सांगितलं जात आहे.  

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

ई-टाइम्सच्या अहवालानुसार मिराजने किक्रेटमधील सट्टा आणि जुगार यावर ३० लाख रुपये घालवले आहेत. आपल्या डोक्यावरील हे कर्ज फेडण्यासाठी या कलाकाराने चोरी आणि चैन खेचण्यासारखे अपराध करण्यास सुरुवात केली. एवढं करूनही तो आपलं कर्ज फेडू शकला नाही. अहवालात असंही नमुद केलं आहे की, मिराज आपला मित्र वैभव जाधवसोबत मुंबईत ही चैन खेचण्याची तसेच चोरीची कामं करत होता

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मिराज आणि वैभव हे दोघे जुनागढ येथे राहणारे असून त्यांना सुरतमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याच्या ३ चैन, २ मोबाईल आणि चोरीच्या बाईकसह २,५४,००० रुपये रोख जप्त केले आहेत. चौकशीनंतर दोघांनी आपला अपराध मान्य केला आहे. आम्ही शांत व सामसूम असलेल्या ठिकाणी महिलांना निशाणा बनवत होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी चोरीची बाईक वापरल्याचेही त्यांनी पोलिसांकडे कबूल केले आहे. मिराजच्या करिअरबद्दल सांगायचं तर त्याने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये छोटीशी भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त ज्युनियर आर्टिस्ट म्हणून ‘थपकी प्यार की’ आणि ‘मेरे अंगने में’ या मालिकांमध्येही तो दिसला होता. याशिवाय अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी त्याने फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम केले आहे.