नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच झाला तारा सुतारिया ...

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच झाला तारा सुतारिया आणि आदर जैनचा ब्रेकअप (Tara Sutaria And Aadar Jain Break Up Amid Marriage Rumours? Deets inside)

तारा सुतारिया आणि आदर जैन अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही अनेकदा एकत्रच दिसायचे, पण नवीन वर्ष सुरू होताच त्यांचे नाते संपुष्टात येऊन दोघांचे ब्रेकअप झाले. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची बातमी येत होती. त्यामुळे लवकरच ते विवाहबंधनात अडकू शकतात असे अनेकांना वाटत होते. पण त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले असून ब्रेकअप झाल्यानंतरही दोघांमधील मैत्री कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. आदर जैन रणबीर कपूरचा चुलत भाऊ आहे. त्यामुळेच आदर आणि तारा कपूर कुटुंबाच्या बहुतेक फंक्शन्समध्ये एकत्र दिसले होते, परंतु गेले काही दिवस दोघेही एकत्र दिसले नव्हते. या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल अधिकृतपणे अजूनही काहीच सांगितलेले नाही. मात्र अशा बातम्या मीडियाच्या नजरेत लपून राहत नाहीत.

तारा आणि आदर यांची भेट 2018 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. दिवाळीच्या पार्टीत दोघांची भेट झाली. दोघेही चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

दोघेही अनेकदा त्यांचे फोटो पोस्ट करत असत. पण याआधी तारा कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टी आणि रणबीर कपूरच्या लग्नात दिसली नव्हती, त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ताराने आपल्या करीअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून केली होती. तारा तिच्या स्टाइल सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.