तापसी पन्नूच्या साडीने ‘चार चांद’ ल...
तापसी पन्नूच्या साडीने ‘चार चांद’ लावले…(Tapasee Pannu Shines In ‘Chand’ Saree Collection)

By Deepak Khedekar in फॅशन

फॅशनचा महासोहळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये नामांकित मॉडेल्स प्रमाणेच बॉलिवूडच्या तारका भाग घेतात. असाच सहभाग तापसी पन्नूने केला. तिने गौरांग या फॅशन डिझायनरच्या ‘चांद’ या साडीच्या फॅशन शो मध्ये भाग घेतला. अन् त्याच्या विणकाम कौशल्याने नटलेल्या सोहळ्यास जणू ‘चार चांद’ लावले.


गौरांगने इथे जमदनी साड्यांवर आपली कलाकुसर केलेली दिसली. विणकाम कौशल्याने परिपूर्ण आणि उत्तम रंगसंगती व एम्ब्रॉयडरीने या साड्या नटल्या होत्या. तापसी पन्नूने नेसलेली आकर्षक रूंद काठपदराची फुलांची साडी तिला अधिकच खुलून दिसली.


गौरांगने करोना काळात, आपल्या कुशल कारागिरांसह हातमागावर जमदनी साड्यांवर काम केले. अन् अनुप जलोटा यांच्या मधूर स्वरांच्या पार्श्वभूमीवर, तापसीसह इतर देखण्या मॉडेल्सनी त्या साड्यांचे प्रदर्शन केले.