महाकाल मंदिरात जाताना तनुश्री दत्ताच्या मोटारील...

महाकाल मंदिरात जाताना तनुश्री दत्ताच्या मोटारीला अपघात होऊन ती जखमी झाली (Tanushree Dutta Suffered With Injuries After Car Accident)

बॉलीवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या मोटारीला अपघात झाला व त्यात ती चांगलीच जखमी झाली आहे. महाकाल मंदिराकडे तनुश्री निघाली असताना हा अपघात घडला. तनुश्रीने इंस्टाग्राम वर महाकालाचे दर्शन व अपघाताचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

इन्स्टाग्राम वर स्वतःच तनुश्रीने ही माहिती प्रसारित केली आहे. आपल्या कारचा ब्रेक नादुरुस्त झाला व हा अपघात घडला, असं तिने म्हटलं आहे.
महाकाल ट्रीपचे फोटो प्रसिद्ध करतानाच तनुश्रीने आपल्या जखम झालेल्या पायाचा फोटो टाकला आहे. सोबत ती लिहिते ‘आजचा दिवस साहसाचा होता!! पण अखेरीस महाकालाचे दर्शन घडले… खरं तर मंदिराकडे जाताना हा अपघात झाला.. जय श्री महाकाल!’

तनुश्री जखमी झाल्याचे समजताच तिचे चाहते चिंतातुर झाले. तिच्या पोस्टवर सदिच्छा देत, तू लवकर बरी होशील, अशी आशा युजर्स व्यक्त करत आहेत.
तनुश्री सध्या प्रसिद्धीच्या झोतात नाही. पण ती सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यावर तिचा बर्‍यापैकी चाहतावर्ग आहे.