लाफ्टर किंग कपिल शर्मा एका एपिसोडचे घेतो एवढे प...

लाफ्टर किंग कपिल शर्मा एका एपिसोडचे घेतो एवढे पैसे (take a look at laughter king kapil sharma’s remuneration per episode)

लाफ्टर किंग अशी ओळख असलेला कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ चा तिसरा सीजन नुकताच संपला. हा तिसऱा सीजन सुद्धा इतर सीजनप्रमाणे तुफान गाजला. या शो मुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. तसेच काहींच्या म्हणण्यानुसार या शोमुळे लाफ्टर थेरपी मिळते. ,इथे आलेल्या कलाकारांची पोल खोल होते. त्यामुळे या शो ला प्रेक्षकांकडून खूप प्रसिद्धी मिळाली होती. या शो मधून कपिलने भरपूर पैसे सुद्धा कमावले.

सध्या कपिल आणि त्याची संपूर्ण टीम सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशी गेले आहेत. सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये ते सगळेच खूप मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येते. कपिलने सुद्धा त्यांच्या मस्तीचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद करुन आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत नेहमी पहिल्या क्रमांकावर असलेला रिअॅलिटी शो कपिलने खूपच छान होस्ट केला होता. आज आम्ही तुम्हाला कपिलने या शो मधून किती पैसे कमावले याची माहिती देणार आहोत.

सध्या कपिलचे नाव सर्वोत्कृष्ट कॉमेडीयन पैकी एक म्हणून घेतले जाते. पण या सर्व गोष्टी कपिलला सहज मिळालेल्या नाहीत. त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. यावेळी ‘द कपिल शर्मा शो’ च्या तिसऱ्या सीजनमध्ये कपिलने प्रत्येक एपिसोडमध्ये 20 लाख रुपये अधिकचे घेतले होते.

मिळालेल्या महितीनुसार कपिलने प्रत्येक एपिसोडसाठी 50 लाख रुपये आकारले होते. म्हणजेच प्रत्येक आठवड्याला कपिल 1 कोटी रुपये कमवायचा. दुसऱ्या सीजनसाठी त्याने प्रत्येक एपिसोडसाठी 30 लाख रुपये आकारले होते.

यावेळच्या तिसऱ्या सीजनमध्ये 80 एपिसोड होते. त्यानुसार त्याने यावेळी या शो मधून 40 करोड रुपये कमावले. या शो च्या चाहत्यांना पुढचा सीजन कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा शो पुन्हा नव्या दिमाखात सगळ्यांना पाहायला मिळेल अशी आशा आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम