या सुपरस्टारमुळे तब्बू आजपर्यंत लग्न करू शकली न...

या सुपरस्टारमुळे तब्बू आजपर्यंत लग्न करू शकली नाही. (Tabu Is Still Single Because Of This Superstar)

‘चांदनी बार’ पासून ते ‘मकबूल’ पर्यंत अनेक चित्रपटातून विविधांगी भूमिका करून तब्बूने आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. हिंदी बरोबरच मराठी, इंग्रजी, तामीळ, तेलगु, मल्याळम,बंगाली अशा अनेक भाषिक चित्रपटातून  तिने कामे केली आहेत. उत्क्रुष्ट अभिनयासाठी तिला २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार व ६ वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले आहेत. शिवाय पद्मश्री सन्मान पटकावला आहे. मात्र ती अद्याप अविवाहित राहिली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
अशा या तब्बूने अलिकडेच एका मुलाखतीत आपण लग्न कां केलं नाही, याचा उलगडा केला आहे. आपण अविवाहित राहिलो, याला कारण एक सुपरस्टार आहे. असं तिनं सांगितले

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
तब्बू मूळची हैदराबादची आहे. १९८३ साली ती मुंबईत आणि २ वर्षे कॉलेजात घालवल्यावर चित्रसृष्टीत प्रवेश केला. ‘हम नौजवान’ या चित्रपटात देव आनंदने तिला संधी दिली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
त्यानंतर ती बोनी कपूरच्या ‘प्रेम’ मध्ये, संजय कपूरची नायिका झाली. नंतर ‘विजयपथ’ मध्ये अजय देवगणची नायिका होती. हा चित्रपट खूपच यशस्वी झाला. अन तब्बूला उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार लाभला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
आपण अजूनपर्यंत अविवाहित या अजय देवगणमुळे राहिलो असल्याचा गौप्यस्फोट तब्बूने मुलाखतीत केला आहे. किजल समीर आर्या आणि अजय देवगण हे तिच्या शेजारी राहत होते. अन तिला भेटायला कोणी मुलगा आला की, हे दोघे त्याला बेदम मारत. त्यामुळे आपण अद्याप कुंवारी राहिलो, असल्याचं तब्बूने जाहीर केलं आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
लग्न केलं नाही, परंतु दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन याच्यासोबत तब्बू १५ वर्षे, डेट करत होती. तो विवाहित असल्याने व आपल्या बायकोला सोडू न शकल्याने त्यांचं लग्न झालं नाही.