‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीताजीने नवीन...

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबीताजीने नवीन घरामध्ये साजरी केली दिवाळी (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Babita ji Bought Her Dream Home, Actress Shares Beautiful Photos of New House)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका मागील कित्येक वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच पात्र घरोघरी पोहचलेले आहेत. यातील सगळ्यांची आवडती बबिताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ताची यावर्षीची दिवाळी खास होती, कारण या दिवाळीत ती आपल्या स्वप्नातील घरामध्ये अर्थात नवीन घरात राहायला गेली आहे. मुनमुन दत्ताने आपल्या नवीन घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती आणि तिचं घर दोन्ही सुंदर दिसत आहेत.

मुनमुन दत्ताने आपल्या घराच्या फोटोंसोबत एक भलीमोठी कॅप्शन लिहिली आहे. त्यात तिने म्हटलंय – ‘नवीन घर, नवीन सुरुवात. दिवाळीनंतर उशिराने पोस्ट… शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत, मी माझ्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. मी खूप आजारी होते, पण आता बरी झाले आहे. माझ्या नवीन घरात एक नवीन प्रवास सुरू करण्यासाठी मी पूर्णपणे रोमांचित आहे. माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.’

अभिनेत्रीने पुढे लिहिले की- ‘मी सोशल मीडियापासून ब्रेक घेतला, आई आणि माझ्या जवळच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवला, त्यांच्यासोबत माझ्या पद्धतीने आनंदाने मी दिवाळी साजरी केली. आज मी जी काही आहे, ती कोणाच्याही मदतीशिवाय, शून्यापासून सुरुवात करून उभी राहिले आहे. मला स्वतःचा अभिमान आहे. माझी मेहनत आणि प्रामाणिकपणा फळाला आला आणि मी धन्य झाले. तुम्हा सर्वांचीही दिवाळी छान गेली असणार अशी आशा करते.’ मुनमुन दत्ताच्या फोटोंवरून कळतंय की, तिचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ती किती आनंदी आहे.

फोटोमध्ये मुनमुनने गुलाबी रंगाच्या लेहेंग्यासह पिवळ्या रंगाचा ब्लाउज घातला आहे. तिने हलकाच मेकअप केला असून सुंदर कानातले घातले होते आणि केस मोकळे ठेवले होते. या पारंपारिक पोशाखात बबिताजी खूपच सुंदर दिसत आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

याशिवाय, चित्रांमध्ये मुनमुनने आपल्या नवीन घराची आणि बाल्कनीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. तिचे नवीन घर दिव्यांनी उजळून निघालेले दिसते. यासोबतच दिवाळीला केलेली नवीन घराची सजावटही पाहण्यासारखी आहे. चाहत्यांना आपल्या नवीन घराची झलक दाखवण्यासोबतच मुनमुन दत्ताने सर्वांची दिवाळी चांगली जावो, अशी आशाही व्यक्त केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर मित्र आणि आप्तेष्ट सोशल मीडियावर कमेंट करून तिचे अभिनंदन करत आहेत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती, त्यानंतर २००४ साली तिने ‘हम सब बाराती’ या मालिकेद्वारे अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले. ती २००५ मध्ये कमल हासनसोबत ‘मुंबई एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसली. याशिवाय २००६ मध्ये आलेल्या ‘हॉलिडे’ चित्रपटातही ती दिसली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिताजीची भूमिका साकारून अभिनेत्रीने नाव आणि प्रसिद्धी मिळवली असली तरी ती तिच्या खऱ्या नावाऐवजी तिच्या पात्राच्या नावाने घरोघरी लोकप्रिय आहे.

 सर्व फोटो सौजन्य: इंस्टाग्राम