‘तारक मेहता का….’मालिकेत तारक...

‘तारक मेहता का….’मालिकेत तारक मेहता उर्फ शैलेश लोढाच्या जागी दिसणार सचिन श्रॉफ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sachin Shroff Replaces Sailesh Lodha In The Show)

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील तारक मेहता उर्फ ​​शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे या मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. प्रेक्षकांचीही प्रतीक्षा आता संपली आहे, निर्मात्यांनुसार, आता सचिन श्रॉफ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये शैलेश लोढा यांच्या जागी तारकच्या भूमिकेत दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. पण काही काळापासून ही विनोदी मालिका चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे एक एक करून मालिकेतील जुने कलाकार मलिका सोडून जात आहेत. आधी अंजली भाभी उर्फ ​​नेहा मेहताने मालिका सोडली, आता या मालिकेच्या महत्त्वाच्या पात्रांपैकी एक असलेल्या शैलेश लोढा उर्फ ​​तारक मेहताने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे.

सुरुवातीला, निर्मात्यांनी शैलेश लोढा यांनी शो सोडल्याच्या बातम्यांना नकार दिला होता. पण नंतर निर्मात्यांकडूनच एक निवेदन जारी करण्यात आले, त्यात शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता…’ मालिकेचे शूटिंग थांबवले आहे असे लिहिले होते. पण आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांना या मालिकेसाठी शैलेश लोढा यांची रिप्लेसमेंट मिळाली आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, आता सचिन श्रॉफ या मालिकेत तारक मेहताच्या भूमिकेत दिसणार आहे.

तसेच सचिन श्रॉफने मालिकेच दोन दिवसांचे शूटिंगही पूर्ण केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत सचिन श्रॉफकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी स्वतः सचिन श्रॉफने मालिकेत प्रवेश केल्याचे सांगितले.

सचिन श्रॉफने याआधीही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. टीव्ही मालिका गुम है किसी की प्यार में आणि आश्रम या वेब सिरीजमध्ये सचिन याने काम केले आहे.