तारक मेहता मधील कलाकार सुनील होळकर यांचे वयाच्य...

तारक मेहता मधील कलाकार सुनील होळकर यांचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन(‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ Fame Sunil Holkar Passes Away At 40)

टीव्ही इंडस्ट्रीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेता सुनील होळकर यांचे निधन झाले आहे. काल वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सुनीलने जगाचा निरोप घेतला.सुनील दीर्घकाळापासून यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला लिव्हर सिरोसिस हा आजार झाला होता, त्याच्यावर उपचारही सुरू आहेत, पण ते उपचार अपयशी ठरले.

सुनीलने अनेक मराठी आणि हिंदी नाटके, चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले होते. तो त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जात असे. त्याच्यामागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. असे म्हटले जाते की, सुनीलला त्याच्या मृत्यूची जाणीव झाली होती. त्याने शेवटची त्याच्या मित्राला व्हॉट्सअॅप केले होते, ज्यामध्ये हा त्याचा शेवटचा मेसेज असल्याचे लिहिले होते. त्याला सर्वांचा निरोप घ्यायचा आहे आणि त्याला मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभारही मानायचे आहेत. याशिवाय त्याला त्याच्या चुकांची माफीही मागायची आहे असे त्यात लिहीले होते.सुनीलने मोरया आणि पैठणी या चित्रपटात काम केले आहे. तारक मेहताशिवाय मॅडम सरमधील त्याच्या कामाचेही खूप कौतुक झाले. अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत त्याने अनेक वर्षे काम केले. सुनीलने ‘गोष्ट एक पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटातही काम केले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने मित्र आणि सेलेब्स शोक व्यक्त करत आहेत.