‘हसीना दिलरूबा’ मधील कामुक दृश्यांच...

‘हसीना दिलरूबा’ मधील कामुक दृश्यांचे शूटिंग कसे झाले? तापसी पन्नूचा गौप्यस्फोट (Taapsee Pannu Made A Big Disclosure About The Shooting Of Intimate Scene In ‘Haseen Dilruba’)

तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला ‘हसीना दिलरूबा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झाला. सस्पेंस आणि जबरदस्त रोमान्स यांनी हा चित्रपट परिपूर्ण आहे. त्यामुळे या चित्रपटात इंटिमेट सीन्स अर्थात्‌ कामुक दृश्यांची रेलचेल आहे. या दृश्यांचे शूटिंग कसे करण्यात आले, याचा गौप्यस्फोट तापसी पन्नूने केला आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आपल्या बरोबर ही कामुक दृश्ये चित्रित करताना हर्षवर्धन आणि विक्रांत मैसी फारच घाबरलेले होते. तापसी सांगते, ”शूटिंग दरम्यान ते दोघे फारच संकोचले होते, हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांचे दडपण बरेच कमी केले. या लोकांच्या मनात माझी काय इमेज बनली आहे की आणखी काही अडचण आहे, हे मला कळत नव्हतं. म्हणून मीच दिग्दर्शकाकडे तक्रार करत असे… ”

अशी धाडसी दृश्ये करताना आपल्या असली पार्टनरची परवानगी घ्यावी लागते का? असा सर्वसाधारण प्रश्न नट्यांना विचारला जातो. त्यावर तापसी म्हणाली, ” या संदर्भात मी माझ्या पार्टनरशी अजिबात विचार-विमर्श करत नाही. कारण हे माझं प्रोफेशनल लाईफ आहे. अन्‌ त्याला पर्सनल लाईफ पासून दूर ठेवते. त्यामुळे आपल्या लाईफ पार्टनरची परवानगी घेण्याची मला गरज वाटत नाही.”

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

तापसी पन्नूच्या कामांबद्दल बोलायचं झालं तर ती लूप, लपेट, दोबारा आणि लक्ष्मी रॉकेट या चित्रपटांमधून दिसणार आहे.