‘दोबारा’च्या प्रमोशनसाठी आलेली तापस...

‘दोबारा’च्या प्रमोशनसाठी आलेली तापसी पन्नू पापाराझी वर भडकली, बोलली – ‘तमीज से बात करिए’ (Taapsee Pannu Heated Argument With Paparazzi, See Viral Video)

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘दोबारा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तापसी पन्नू वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे. तापसी अशाच एका कार्यक्रमाला गेली असताना तिचे तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींसोबत भांडण झाले. तापसीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

तापसी अभिनय कौशल्यासोबतच बिनधास्त आणि बोल्ड अंदाजासाठी सुद्धा ओळखली जाते. तापसी पन्नू आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात गेली होती. पण तिथे पोहोचल्यानंतर तापसीसोबत असे काही घडले की, अभिनेत्रीचे पापाराझींसोबत वाद झाले. तापसी पन्नूला पापाराझींचा राग आला.

वादानंतर तापसीने पापाराझींना ती का ओरडत होती याचे कारण सांगितले. पण तिथे उपस्थित असलेले फोटोग्राफर्सही गप्प बसले नाहीत. त्यांनी देखील तापसीला चोख उत्तर दिले.

तापसी पन्नूचा आगामी दोबारा हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. सध्या ती त्याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भात ती मुंबईतील एका हॉटेलमध्ये पोहोचली जिथे तिचे पापाराझींसोबत वाद झाले. पापाराझींसोबत अभिनेत्रीच्या या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून लोक तापसीची खिल्ली उडवत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत असे दिसते की, तापसी हॉटेलमध्ये पोहोचताच, पापाराझी तिचा फोटो क्लिक करण्यासाठी तिच्या मागे धावतात. पापाराझीने अभिनेत्रीला थांबण्याची विनंती केली, पण तापसी थांबली नाही. पुढे ती एका ठिकाणी थांबते आणि पापाराझींला म्हणते, ‘तुम्ही मला शिव्या का देत आहात ? यात माझी काय चूक? तुम्ही माझ्याशी नम्रपणे बोला.” यावर पापाराझी तिला म्हणतात की, आम्ही तुमच्याशी नम्रपणेच बोलत आहोत. आम्ही 4:30 पासून तुमच्यासाठी इथे उभे आहोत. 

यावर तापसी म्हणाली की, तुम्ही माझ्याशी नीट बोला. मी माझे काम करत आहे. मला त्यांनी ज्या वेळेवर बोलावले , त्या वेळेवर मी आली आहे. तुम्ही माझ्याशी नम्रपणे बोला. सध्या कॅमेरा फक्त माझ्या दिशेला आहे, त्यामुळे फक्त मी काय बोलते ते दिसत आहे. कॅमेरा जर तुमच्या दिशेने असता तर तुम्हाला समजले असते तुम्ही कशाप्रकारे बोलत आहात. तुमच्या मते तुम्हीच नेहमी बरोबर असता आणि कलाकार चुकीचे..जाऊ दे घ्या फोटो…