तापसी पन्नूने पुन्हा एकदा दाखवला पापाराझींना मा...

तापसी पन्नूने पुन्हा एकदा दाखवला पापाराझींना माज, त्यामुळे अभिनेत्रीची झाली जया बच्चनसोबत तुलना(Taapsee Pannu Gets Brutally Trolled For Her Attitude Towards Paparazzi, Netizens Say, ‘Iske Andar Bhi Ek Chhoti Si Jaya Bachchan Rehti Hai…’)

एक काळ असा होता की तापसी पन्नू आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांची मने जिंकायची, पण गेल्या काही वर्षांपासून तिचे चित्रपट फारसे चालत नाहीत, पण तिच्या तापट स्वभावाची चर्चा नेहमीच होत असते.

तापसी अनेकदा पापाराझींसोबत अडचणीत सापडली आहे. अशीच घटना पुन्हा एकदा घडली. अभिनेत्री कॅज्युअल लूकमध्ये दिसली तेव्हा पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक करण्यासाठी पोहोचले. तेव्हा तापसी त्यांना म्हणाली की, सांभाळून नाहीतर लागेल, आणि  मग म्हणाल अभिनेत्रीमुळे लागले. यावर पापाराझी म्हणाले – नाही मॅडम, आम्ही तसे नाही आहोत…

पापाराझी हे म्हणत असताना तापसी त्यांच्याकडे पाहतही नाही. तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन ती कारमध्ये बसून निघून गेली. अभिनेत्री खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत होती. डेनिम शॉर्ट्स आणि फिकट पिवळ्या रंगाचा बेसिक टी-शर्ट या पोशाखावर तिने आपले केस मोकळे सोडलेले.

युजर्सना तापसीची ही स्टाइल अजिबात आवडली नाही. त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. बहुतेक युजर्सनी तिची जया बच्चनशी तुलना करायला सुरुवात केली. युजर्स तिला जया बच्चन पार्ट 2 म्हणत आहेत. तर काहीजण तिला छोटी जया बच्चन म्हणत आहे. एकाने लिहिले – तिच्यात छोटी जया बच्चन घुसली आहे.

काहीजण तर असेही म्हणत आहेत की हिचे सर्वच चित्रपट फ्लॉप होत आहेत, मग हिला कसला माज आहे. युजर्स पापाराझींना असेही सांगत आहेत की तुम्ही लोक तुमचा अपमान करायला का जाता, या लोकांना तुमची किंमत कळू द्या. एकाने लिहिले, ही कधीच चांगलं बोलत नाही. आजही घरातून मार खाऊन आलीय वाटतं.

येत्या काळात तापसी डंकी या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे.