अभिनय क्षेत्रासोबतच तापसी पन्नू करते हे जोडधंदे...

अभिनय क्षेत्रासोबतच तापसी पन्नू करते हे जोडधंदे (Taapsee Pannu Does This Work Apart From Acting, You Will Also Be Impressed after Knowing It)

अभिनेत्री तापसी पन्नूच्या बहुप्रतिक्षित ‘शाबाश मिट्ठू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात माजी महिला क्रिकेटपटू ‘मिताली राजचा’ संघर्ष दाखवण्यात आला आहे. तापसीने अनेक चित्रपटात काम केले. पण तिने तिच्या आयुष्यात खूप मेहनत घेतली आहे. इंजीनियरिंगची नोकरी सोडल्यावर तिने मॉडेलिंग कऱण्यास सुरुवात केली. पुढे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी तापसी अभिनयाव्यतिरिक्त बिझनेससुद्धा करते हे फारच कमी लोकांना माहित आहे. तिच्या या बिझनेस टॅलेंटची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या फिल्मी करीअरमध्ये खेळांवर आधारित चित्रपट जास्त केले आहेत. त्यावरुनच तिचे खेळांवरील प्रेम दिसून येते. विशेष म्हणजे तापसीचा बॉयफ्रेंड  Mathias Boe हा देखील क्रिडाविश्वाशी निगडीत असून तो एक बॅडमिंटनपटू आहे.

तापसीच्या बिझनेसबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री व्यतिरिक्त ती एक उत्तम वेडिंग प्लॅनरसुद्धा आहे. तिची ‘द वेडिंग फॅक्ट्री’ नावाची कंपनी आहे. तसेच ती ‘पुणे सेव्हन एसेस’ या बॅडमिंटन फ्रेंचाइजीची मालक आहे.

तापसीला सगळे तिच्या खऱ्या नावाने ओळखतात पण तुम्हाला तिचे टोपण नाव माहित आहे का ? तापसीचे टोपण नाव ‘मॅगी’ असे आहे. तिचा मित्रपरिवार आणि जवळील लोक तिला मॅगी म्हणूनच हाक मारतात. तापसी कथ्थक विषारद आणि भरतनाट्यम डान्सर आहे. तिने डान्सच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तापसी एक प्रसिद्ध मॉडेल होती. पण आपली मॉडेलिंगमध्ये काहीच प्रगती होत नाही याची जाणीव झाल्यावर तिने चित्रपटात काम करण्याचे ठरवले. तापसीने 2008 मध्ये मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये भाग घेतला होता.

तापसीचा जन्म दिल्लीला झाला. तिथेच तिने शिक्षण घेतले. तापसीने कॉम्प्यूटर सायन्समध्ये पदवी मिळवली आहे. पदवी मिळाल्यावर तिने सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून काम केले. पण तिने ते सोडून मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला. तिने अनेक ब्रॅण्डसाठी जाहिराती केल्या त्यानंतर ती चित्रपट करू लागली.

तापसीने 2010 मध्ये तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली. त्यानंतर 2011 मध्ये तिने तमिळ चित्रपट केला. साऊथच्या अनेक कलाकारांसोबत काम केल्यानंतर तापसीने 2013 मध्ये डेविड धवनच्या चश्मे बद्दूर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यावेळी तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र त्यानंतर तापसीने अनेक हिट चित्रपट दिले.