बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रिय असल...

बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रिय असलेल्या टी.व्ही.च्या नट्या (T.V. Actresses Who Are More Famous Than Our Bollywood Actresses)

आजच्या युगात सिनेमापेक्षा टेलिव्हिजनचे कार्यक्रमांकडे प्रेक्षकांचा कल आहे. त्यामुळे टी.व्ही.वर काम करणारे कलाकार रातोरात घरातल्या सर्व लोकांच्या मनात शिरतात. तेव्हा आपण अशा काही टी. व्ही. नट्या पाहूयात, ज्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रिय ठरल्या आहेत.


रुबिना दिलैक

‘बिग बॉस १४’ या कार्यक्रमाची विजेता रुबिना दिलैकला ज्या पद्धतीने लाखो-करोडो व्होटस्‌ मिळाले, त्यावरूनच तिची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज येतो. ‘शक्ती-अस्तित्त्व के एहसास’ पासून ते ‘छोटी बहू’ पर्यंत रुबिनाने टी.व्ही. वर लोकांची मने जिंकली. बिग बॉसच्या इतिहासात, सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड करणारी स्पर्धक म्हणून रुबिनाची गणना झाली आहे.
दिव्यांका त्रिपाठी

टेलिव्हिजनची सर्वाधिक लोकप्रिय स्टार असे दिव्यांकाला म्हटले जाते. ‘ये मोहब्बते’ या मालिकेतून इशिताची भूमिका करून ती प्रत्येक घरातील आईची आवडती सून गणली गेली. आपले देखणे रूप आणि अभिनय गुणांच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनात घर केलं. नेहमी साधी राहणारी दिव्यांका, सोशल मीडियावर हिना खान पेक्षा अधिक लोकप्रिय आहे.
हिना खान

टी. व्ही. नागिन आणि बिग बॉसच्या ११व्या भागाची फायनलिस्ट म्हणून गाजलेली हिना खान १४व्या भागातही होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या कार्यक्रमातून तिची संस्कारी सुनेची भूमिका खूप गाजली. ती सोशल मीडियावर आपल्या एकेक अदा अशा दाखवते की, तिचे चाहते वेडे होतात. तिची एक झलक तरी दिसावी म्हणून आसुसलेले असतात.
मौनी रॉय

टी. व्ही. ची सर्वाधिक आवडती स्टार अशी मौनी रॉयची ख्याती आहे. नागिणीची भूमिका करून तिनं प्रेक्षकांची मने जिंकली. तिने ‘महादेव’ आणि ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या कार्यक्रमातही काम केले आहे. ती अतिशय चांगली डान्सर आहे. काही चित्रपटात तिने आयटम डान्स केले आहेत. ती सर्वाधिक पैसे मिळवणारी नटी आहे. शिवाय सोशल मीडियाची क्विन पण आहे.
शिवांगी जोशी

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ची नायरा अर्थात्‌ शिवांगी जोशीने अल्पावधीतच इतकी लोकप्रियता मिळवली की, जी मिळवायला बॉलिवूडच्या एखाद्या अभिनेत्रीला कित्येक वर्षें लागली असती. तिची लोकप्रियता इतकी आहे की, या कार्यक्रमात नायरा मेली असे दाखविण्यात आले, तेव्हा प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आपला राग व्यक्त केला.
निया शर्मा

ही सेक्सी कलाकार, आपल्या बोल्ड वर्तणुकीने सदैव चर्चेत असते. ‘जमाई राजा’ ते ‘खतरों के खिलाडी’ पर्यंत आणि ‘नागिन ४’ अशा अनेक कार्यक्रमात तिनं लोकांची प्रशंसा मिळवली. अन्‌ सोशल मीडियावर तर तिचं असं अढळ स्थान आहे की, तिनं फक्त लालभडक लिपस्टीक लावून फोटो टाकला तरी इंटरनेटवर जणू आग लागते. आशिया खंडातील सर्वात सेक्सी १० अभिनेत्रींची जी यादी आहे, त्यामध्ये गेल्या ५ वर्षांपासून तिने आपले नाव राखले आहे.
जेनिफर विंगेट

टी. व्ही. वरील सगळ्यात महागडी आणि प्रेक्षकांना आवडणारी अशी जेनिफर आहे. ‘बेहद’ मालिकेतील मायाच्या भूमिकेला खूप लोकप्रियता लाभली. ‘सरस्वतीचंद्र’, ‘दिल मिल गए’, ‘कही तो होगा’ अशा गाजलेल्या मालिकांमधून काम केलेली जेनिफर कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे.
करिश्मा तन्ना

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘झलक दिखला जा’, पासून ते ‘बिग बॉस’ व ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमांतून भूमिका करून करिश्मा तन्नाने टेलिव्हिजनवर खूप लोकप्रियता मिळवली आहे. आपले छान छान व स्टायलिश फोटो सोशल मीडियावर टाकत ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्ड अदाकारीवर चाहते वेडे झाले आहेत. इन्स्टाग्रामवर तिला पसंत करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

१० लोकप्रिय टी.व्ही. तारकांचे सिक्रेट टॅटू