टी. व्ही. ची नागिण, निया शर्मा पुन्हा एकवार बिन...

टी. व्ही. ची नागिण, निया शर्मा पुन्हा एकवार बिनधास्त झाली; उरोभागाचे प्रदर्शन केल्याने झाली टीकेची धनी (T.V. Actress Nia Sharma Once Again Shows Her Bold Style : Trolled For Sharing Cleavage Photo)

टेलिव्हिजन सृष्टीतील अभिनेत्रींमध्ये बिनधास्त वागून चाहत्यांना चक्रावून टाकण्यामध्ये निया शर्मा आघाडीवर आहे. आपले धक्का देणारे ग्लॅमरस फोटो मीडियावर टाकून ती चाहत्यांची पसंती मिळवते. पण यापैकी काही चाहते तिच्यावर टीकेचा भडिमार  करताना आढळतात. आत्ताही नेमकं तेच घडलं आहे. निया शर्माने आपला उरोभाग दर्शविणारे ताजे फोटो सोशल मीडियावर टाकले अन काही लोकांच्या टिकेची ती धनी झाली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
निया शर्माने नुकताच सोशल मिडीयावर आपला एक हॉट फोटो प्रकाशित केला आहे. तो बघून चाहत्यांना घाम फुटला आहे. तिचा हा फोटो काहींना आवडला आहे, तर काहींनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या फोटोत नियाने स्ट्रिपॅलेस टॉप घातले आहे. त्यामधून तिचे उरोज डोकावत आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
नियाच्या या फोटोची काहींनी ‘सुंदर’ अशी तारीफ केली आहे तर काही जण म्हणतात, ‘तू सुंदर आहेस ग. पण हा फोटो तुला शोभत नाही. तू रोल मॉडेल आहेस, याचे तरी भान ठेव ना!’

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
अर्थात नियाच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडलेले नाही. मागच्या खेपेला तर ‘तू कपडे तरी कशाला घालतेस ग,’ अशी तिची निंदा केली होती. तेव्हा ‘मला जसे कपडे  घालावेसे वाटतात, ते मी घालणार. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही,’ असं उत्तर तिनं दिलं होत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
नियाच्या कामकाजाबद्दल बोलायचं तर ‘एक हजारों में मेरी बहना  है’ या सोज्वळ मालिकेतून तिचं करिअर सुरु झालं, नंतर ‘जमाई राजा,’ ‘खतरों के खिलाडी, आणि ‘नागिन’ मधून तिला जास्त लोकप्रियता मिळाली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम