चित्रपट पर्यटनाला वेग देण्याची योजना (Symposiu...

चित्रपट पर्यटनाला वेग देण्याची योजना (Symposium To Promote Film Tourism)

चित्रपट आणि पर्यटन यांचा अतिशय घनिष्ट संबंध असून पर्यटनाला चालना देण्यात, चित्रपट अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात, असे मत माहिती व प्रसारण सचिव, अपूर्व चंद्रा यांनी व्यक्त केले. पर्यटन मंत्रालय आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहयोगाने आयोजित चित्रपट पर्यटनावर काल एक परिसंवाद झाला. त्यात ते बोलत होते.

“चित्रपटांमुळे लोक मोठया प्रमाणावर पर्यटन स्थळांकडे आकर्षित होतात. जेव्हा मी स्वतः पर्यटनाला बाहेर जातो तेव्हा माझ्या मनात चिञपटात  पाहिलेले दृश्य घोळत असते,” असे चंद्रा म्हणाले.

स्वित्झर्लंड मधील शिखरांपैकी एकाला बी.आर.चोप्रा एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं आहे, तर जम्मू-काश्मीर येथील तवांग मधील तलावाला माधुरी दीक्षितचे  नाव देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘राज्य सरकारांनी चित्रपट प्रोत्साहन कार्यालय स्थापन करण्याचा विचार करावा. चित्रीकरणासाठी परवानग्या वेळेवर मिळाव्यात, यासाठी हे कार्यालय शक्यतो मुख्यमंत्री कार्यालयात असावे.” अशी महत्वाची  सूचना पर्यटन सचिव अरविंद सिंग यांनी या प्रसंगी केली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लोकप्रिय सिनेमांचे जिथे चित्रीकरण झाले आहे, त्या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढलेला दिसून आला आहे. अशी माहिती देण्यांत आली.
– नंदकिशोर धुरंधर