सूर्यास्तापूर्वी घरात दिवे लावा… (Switch ...

सूर्यास्तापूर्वी घरात दिवे लावा… (Switch On The Lights Before Sunset)

घरातील सकारात्मक ऊर्जा घरातच टिकून राहावी, यासाठी कोणता सोपा उपाय करता येईल?

 • प्रार्थना, गोरेगाव
  घरातील सकारात्मक (शुभ) ऊर्जा घरातच राहावी, म्हणून घराच्या आत दरवाजाच्या वर (आतल्या बाजूनेच) एक गोल आरसा बसवा. या आरशामुळे घरातील शुभ ऊर्जा परावर्तित होऊन, पुन्हा घरातच स्थिरावते.

मी एक क्रीडापटू आहे. यशस्वी होण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. मात्र त्यास साहाय्यक म्हणून, यश वाढवण्यासाठी मला अजून काही उपाय करता येतील का?

 • गायत्री, कळवा
  घरातील दक्षिण दिशा ही व्यक्तीस प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळवून देते. तेव्हा या दिशेचा वापर करता येईल. त्यासाठी या दिशेला तुमचं सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तुमचा फोटो लावा. तुमच्या प्रयत्नांना जास्तीत जास्त यश मिळून, तुम्ही प्रसिद्धी मिळू शकेल.

मला माझ्या मैत्रिणीने धावत्या घोड्यांचं चित्र असलेली फ्रेम भेट दिली आहे. ती घरात लावावी का आणि कोणत्या दिशेला लावावी?

 • किरण, सांगली
  वेगात धावणारे घोडे, तेही पाण्यातून हे उद्यमशीलतेचं द्योतक आहे. तेव्हा अशी फ्रेम उत्तर दिशेला लावावी. आणि फे्रममधील घोड्यांचं तोंड घरात आतल्या बाजूस असावं. बाहेरच्या दिशेला असू नये.

माझ्या घरात सूर्यप्रकाश येत नाही. यासाठी काही पर्यायी उपाय आहे का?

 • नयना, पुणे
  घरात सूर्यप्रकाश येत नसेल, तर दिवसासुद्धा घरात दिवे लावा. तसंच संध्याकाळी प्रत्येकाने सूर्यास्तापूर्वीच घरामध्ये दिवे उजळले पाहिजेत. लवकर दिवे उजळले, तर ऊर्जा तुमच्या घराच्या दिशेने येते आणि सूर्यास्तापूर्वी तुमच्या घरात ती स्थिर होते. यामुळे घरातील व्यक्तींचे 25 टक्के प्रश्‍न सुटतात.