मेंहदी सोहळ्यासाठी केशरी अनारकली तर संगीत सोहळ्...

मेंहदी सोहळ्यासाठी केशरी अनारकली तर संगीत सोहळ्यासाठी हिरवा घागरा…आपल्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात अशी तयार झाली स्वरा भास्कर (Swara Bhasker Wears Orange For Mehendi, Twins With Fahad In Green For Sangeet, See Pics)

बॉलिवूडमध्ये सध्या लगीनसराई चालू आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी प्रियकर फहाद खानसोबत लग्न झाल्याचे फोटो टाकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा विधीवत लग्न करत आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांचा रविवारी दिल्लीत मेहेंदी आणि संगीत सोहळा पार पडला. या समारंभाचे काही फोटो आणि व्हिडिओ स्वराने तिच्या स्वतःच्या इन्स्टा स्टोरीजमध्ये शेअर केले आहेत.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. रविवारी, स्वरा भास्करने आपल्या इन्स्टा स्टोरीवर फहाद अहमदसोबत मेहंदी आणि संगीत समारंभाचे सुंदर फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. या जोडप्याच्या संगीत सोहळ्यात लोकगायक दिन खान यांनी लाईव्ह परफॉर्म केले.

 मेहेंदी समारंभात, स्वरा केशरी रंगाच्या गोटापट्टी अनारकली ड्रेसमध्ये दिसली होती. अभिनेत्रीने मोठे कानातले आणि मांग टिक्कासह लूक पूर्ण केला होता. तर फहादने आकाशी कुर्ता पायजमा असलेले नेहरू जॅकेट घातलेले होते. स्वराने मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “अपनी शादी की बात रहती है.”

कार्यक्रमासाठी तयार होण्यासोबतच अभिनेत्रीने आपल्या मेकअप रूमच्या काही झलकही शेअर केल्या आहेत.

यामध्ये स्वराने तिची आणि फहदची मेहेंदीही दाखवली. जोडप्याच्या मेहेंदीनंतर संगीताचा कार्यक्रम झाला.

संगीत कार्यक्रमासाठी रंगीबेरंगी स्टेज बनवला होता. तसेच जोडप्याला बसण्यासाठी एक सुंदर जागा होती.

संगीत सेरेमनीसाठी स्वराने हिरव्या रंगाचा एम्ब्रॉयडरी लेहेंगा परिधान केला होता. फहादनेही स्वरासोबत ट्विन करत गडद हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.

संगीत सेरेमनीदरम्यान, स्वराने दिन खानचे गाणे गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले, “रात्रीची सुरुवात करण्याचा काय मार्ग आहे.”

यापूर्वी स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या हळदी सोहळ्याची झलक समोर आली होती.