स्वरा भास्कर आणि फहाद अहमद आता हिंदू पद्धतीने क...

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद आता हिंदू पद्धतीने करणार लग्न, लग्नाचे विधी झाले सुरू, पाहा व्हिडिओ (Swara Bhasker And Fahad Ahmad’s Wedding Rituals Kickstart This Weekend, FIRST Video Out)

स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत ६ जानेवारीलाच कोर्ट मॅरेज केले. मात्र, काही दिवस स्वराने लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. आता परत एकदा स्वरा भास्कर ही फहाद अहमद याच्यासोबत हिंदू रितीरिवाजाने लग्न करणार आहे.

दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. १२ मार्चपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. कर्नाटकमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली. अन्‌ आता फहादचा मित्र फराज अन्सारीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सोफ्यावर बसून ड्रमच्या तालावर जबरदस्त डान्स करत आहे.  हा व्हिडीओ शेअर करत फराजने लिहिले की, “.. आणि स्वरा आणि फहादच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरू झाले. लग्नाचा अधिकृत हॅशटॅग स्वादानुसार आहे.”

दिल्लीत स्वराच्या आजोबांच्या घरी ही लग्नाची तयारी सुरू आहे. हा विवाह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. वृत्तानुसार- लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये कव्वालीचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे.  संपूर्ण व्यवस्था पाहुण्यांसाठी एखाद्या ‘बैठकी’सारखी असेल.  लग्नासाठी फक्त जवळच्या नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.  १६ मार्च रोजी, स्वरा आणि फहाद दिल्लीतील त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी रिसेप्शन आयोजित करतील. या लग्नात अभिनेत्री सोनम कपूर, दिव्या दत्ता आणि चित्रपट निर्माते फराज अन्सारी उपस्थित राहणार असल्याचे समजते.

या बातम्यां दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वराच्या घरचा आहे, या व्हिडिओमध्ये स्वरासोबत फहादही दिसत आहे.  हा व्हिडिओ पाहून हे जोडपे लग्नाच्या तयारीत असल्याचे दिसते.