‘माझी कामवाली बाई, साडीमध्ये तुझ्यापेक्षा...

‘माझी कामवाली बाई, साडीमध्ये तुझ्यापेक्षा जास्त सुंदर व शालीन दिसते’ – या शब्दात युजरने स्वरा भास्करचा केला धिक्कार (Swara Bhaskar Responds To Troll Who Said ‘My Maid Looks Better Than You In Sari’)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. यावेळी देखील असेच काहीसे झाले. पण स्वरा शांत बसली नाही तिने त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी स्वराने साडीतला एक फोटो शेअर केला होता आणि त्यात लिहिले होते – साडी, पार्क, चालणे, पुस्तक… शांतता वाटली पाहिजे… हॅश टॅगमध्ये तिने ‘लहानसे आनंद’ असे लिहिले आहे…

या पोस्टमुळे स्वराला ट्विटरवर खूप ट्रोल करण्यात आलं, कुणी म्हटलं की, ‘तू साडी का घातली…?’ कुणीतरी तिला अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्लाही दिला आणि एका युजरने लिहिलं की, “माझी मोलकरीण साडीत तुझ्यापेक्षा जास्त सुंदर व शालीन दिसते.” हे ट्वीट पाहिल्यानंतर स्वराने त्या नेटकऱ्यासही सडेतोड उत्तर देत म्हटले- , “मला खात्री आहे की तुमची मोलकरणी सुंदर दिसत असेल. मला आशा आहे की तुम्ही तिच्या कामाचा आदर करत असाल आणि तिच्यासोबत मूर्खासारखं वागत नसणार.” स्वराचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

स्वराने ‘प्रेम रतन धन पायो’, ‘वीरे दी वेडिंग’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या वर्षी तिची ‘भाग बिनी भाग’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. स्वराचा ‘शीर कुर्मा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.