ना फेरे, ना निकाह पठण असा होता स्वरा भास्कर आणि...

ना फेरे, ना निकाह पठण असा होता स्वरा भास्कर आणि फहाद खानचा आगळावेगळा विवाह, पाहा फोटो(Swara Bhaskar marries Fahad Ahmad without Feras and without Nikah, Newly Wed couple’s wedding pics goes viral)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिने राजकारणी आणि कार्यकर्ता फहाद अहमदसोबत गुपचूप कोर्ट मॅरेज केले. आणि अचानक आपले लग्न झाल्याचा खुलासा करत सर्वांना आश्चर्यचकित केले. आता तिने फहादशी पूर्ण विधींवत लग्न केले आहे.

स्वरा-फहादने 13 मार्च रोजी दिल्लीत आपल्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्न केले. स्वराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फहादसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती दक्षिण भारतीय वधूच्या लूकमध्ये दिसत आहे.

मरून – सोनेरी रंगाची साडी आणि दागिने घातलेली स्वरा, हातावर मेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, आणि केसात गजरा घालून खूप सुंदर दिसत आहे. स्वराचं लग्न तिच्या आजीच्या फार्म हाऊसमध्ये झालं.

स्वराने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की ती तेलगू वधू बनली आहे आणि कर्नाटकी गायिका सुधा रघुरमनने तिच्या लग्नात लाइव्ह परफॉर्म केले.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की या जोडप्याने सप्तपदी न करता किंवा निकाह न वाचताच लग्न केले. दोघांनाही लग्नाआधीचे हळदी, मेहंदी आणि संगीताने कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले होते, पण त्यांना कोणत्याही प्रथेनुसार लग्नाचे विधी करायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी प्री-वेडिंग फंक्शन मोठ्या थाटात पार पाडलं पण कोणत्याही विधीशिवाय लग्न केलं.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या लग्नाचे हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होऊ लागले आहेत. दुस-यांदा लग्नबंधनात अडकल्याबद्दल चाहते दोघांचे अभिनंदन करत आहेत.

16 मार्च रोजी दिल्लीतच रिसेप्शनचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये नातेवाईक आणि जवळच्या कुटुंबातील मित्रांना आमंत्रित करण्यात आले आहे.