लग्नाचे आणखी नवीन फोटो शेअर करत अभिनेत्री स्वरा...
लग्नाचे आणखी नवीन फोटो शेअर करत अभिनेत्री स्वरा भास्कर ने ट्रॉलर्सना दिले चोख उत्तर..(Swara Bhaskar hits back at trolls by sharing new happy wedding pics, writes- ‘Haters: suitcase, fridge, illegitimate, conversion…’)

By Rajendra . in मनोरंजन
लग्न झाल्यापासून अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद सतत चर्चेत आहे. ट्रॉलर्स त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोलिंग करत आहेत. इतर सर्व सामान्य लोक सुद्धा स्वराला नको नको ते सुनावत आहेत. या सर्व प्रकाराला वैतागून आता स्वराने सर्वांनाच चोख उत्तर दिले आहे.

ट्विटरवर स्वराने आपल्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच आनंदी दिसत आहे. त्यातील एका फोटोत अभिनेत्री फहादला मिठी मारून सेलिब्रेशन करत आहे

तर दुसऱ्या फोटोत तिचा पती अभिनेत्रीच्या आईला मिठी मारत आहे. हे फोटो शेअर करून स्वराने तिला ट्रोल करणाऱ्यांना एक इशारा दिला व लिहिले, कोणी काही म्हणत या लग्नामुळे मी खूप खुश आहे. द्वेषी- सुटकेस, फ्रिज, बेकायदेशीर ,रूपांतरण ब्लाह ब्लाह ब्ल..

विशेष म्हणजे स्वराच्या या ट्विटवर सुद्धा लोक तिला ट्रोल करत आहेत ,तिची खिल्ली उडवत आहेत.

१६ फेब्रुवारीला स्वराने आपल्या ट्विटर हँडल वर स्वतःचा आणि आपल्या पतीचा फोटो व व्हिडिओ शेअर करत लग्न झाल्याची घोषणा केली होती.