वासनेची आवड असलेली रहस्यमय स्त्री (Suspense Sto...

वासनेची आवड असलेली रहस्यमय स्त्री (Suspense Story Of Lust And Love In New Serial)

उद्यापासून शेमारू टी.व्ही. वाहिनीवर ‘अनामिका’ नावाची एक रहस्यमय मालिका सुरू होत आहे. या मालिकेची नायिका एक रहस्यमय स्त्री आहे, जिची वासना तिची आवड आहे. ती मिळवण्यासाठी ती सर्व मर्यादा ओलांडते.

अनामिका ही विलक्षण शक्तीची मालकीण आहे. जीत नावाच्या तरुणाला ती आकर्षित करण्याचा आणि त्याचे मन जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. परंतु जीत तिला भीक घालत नाही. कारण त्याची बालपणीची मैत्रिण रानो, हिच्या तो प्रेमात आहे. मात्र जीतला आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अनामिका तिच्या शक्तींचा पुरेपूर वापर करते. अन्‌ त्यातून एक रहस्यमय, मनोरंजक कथा पुढे सरकते.

अनामिकाची ही वेगळी भूमिका सिमरन कौर साकारत असून मुदित नायर आणि ॲनी गिल जीत व रानोची भूमिका करत आहेत.