सुष्मिता सेनची मॉडेलिंग क्षेत्रातील वारंवार पाह...

सुष्मिता सेनची मॉडेलिंग क्षेत्रातील वारंवार पाहाविशी वाटणारी दिलखेचक छायाचित्रे (Sushmita Sen’s ‘Miss Universe’ and Modeling Days Throwback Photos, Which You Want to See Again and Again)

अतुलनीय सौंदर्य आणि जबरदस्त अदांनी करोडो हृदयांवर राज्य करणारी माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतेच आपल्या वयाची ४६ वर्षे पूर्ण केली आहेत. हैदराबादमधील एका बंगाली कुटुंबात तिचा जन्म झाला. चित्रपट कारकिर्दीत सुष्मिताचे नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले असले तरी, तिने अद्याप लग्न केलेले नाही, तरीही ती दोन दत्तक मुलींची आई आहे. अन्‌ गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुष्मिता रोहमन शॉलला डेट करत आहे. नुकताच झालेल्या तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासोबतच, सुष्मिता सेनचे मॉडेलिंग क्षेत्रातील वारंवार पाहावेसे वाटणारे दिलखेचक फोटोही नजरेखालून घालूया.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

खरं तर, १९९४ मध्ये ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सुष्मिताला जेव्हा कळलं की ऐश्वर्या राय देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे, तेव्हा तिचं सौंदर्य पाहून सुष्मिताचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि तिने माघार घेण्याचं ठरवलं होतं. परंतु मग आईने समजूत घातल्यानंतर सुष्मिताने हिम्मत करून या स्पर्धेत भाग घेतला. आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुष्मिताने ऐश्वर्याला हरवून मिस इंडियाचा किताब आपल्या नावे केला.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सुष्मिता आणि ऐश्वर्याला एक कॉमन प्रश्न विचारला गेला की, जर तुम्ही कोणतीही ऐतिहासिक घटना बदलू शकत असाल तर ती काय असेल? यावर ऐश्वर्या राय म्हणाली की तिला तिच्या जन्माची वेळ बदलायची आहे, तर सुष्मिताने उत्तर दिले – इंदिरा गांधींचा मृत्यू. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९९४ मध्ये सुष्मिताने ‘मिस इंडिया’ आणि ‘मिस युनिव्हर्स’ हे दोन्ही किताब जिंकले होते.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

लग्नाबाबत एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितले होते की, “प्रत्येक चांगल्या कामासाठी योग्य वेळ असते आणि त्यासाठी धीर धरावा लागतो. ती वेळ अजून आलेली नाही, पण तो दिवस नक्कीच येईल, जेव्हा मी लग्न करेल,” असं अभिनेत्री म्हणाली होती. मात्र, लग्न न करता सुष्मिता अलिशा आणि रिनी या दोन दत्तक मुलींची आई आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत असलेली सुष्मिता तिच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करत आहे. रोहमनसोबतच्या नात्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. मागच्या वर्षी इंस्टा लाईव्ह सेशनमध्ये सुष्मिताला लग्नाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला असता तिने तो प्रश्न रोहमनकडे वळवला. रोहमननेही या प्रकरणी निर्णय घेतल्यावर सर्वांना सांगेन, असे सांगून काढता पाय घेतला.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

सुष्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सुष्मिताची ‘आर्या’ वेब सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली होती. यामधील सुष्मिताच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. एका गृहिणीतून डॉन बनण्याच्या कथेवर आधारित या सिरीजमध्ये सुष्मिताने अतिशय दमदार व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याचा दुसरा सीझनही आला आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

सुष्मिता सेनने ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या २५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुष्मिताने ‘सिर्फ तुम’, ‘मैं हूं ना’, ‘आंखे’, ‘बीवी नंबर 1’, ‘मैने प्यार क्यूं किया’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही ती दिसली आहे.